चीनने इस्रायलचे नाव नकाशावरून हटवले; गदारोळ झाल्यानंतरही कारण अजूनही अस्पष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 04:10 PM2023-10-31T16:10:31+5:302023-10-31T16:27:06+5:30

इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या सीमा दाखवल्या आहेत पण नकाशातून दोघांचीही नावे गायब आहेत.

China erases Israel's name from the map; The reason behind the commotion is still unclear! | चीनने इस्रायलचे नाव नकाशावरून हटवले; गदारोळ झाल्यानंतरही कारण अजूनही अस्पष्ट!

चीनने इस्रायलचे नाव नकाशावरून हटवले; गदारोळ झाल्यानंतरही कारण अजूनही अस्पष्ट!

गाझा पट्टीमध्ये इस्रायलचे हल्ले तीव्र होत असताना चीनने आपल्या ऑनलाइन नकाशातून इस्रायलचे नाव हटवल्याची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, चिनी कंपन्यांच्या Baidu आणि Alibabaच्या ऑनलाइन नकाशांमधून इस्रायलचे नाव गायब आहे. बैदूच्या नकाशात इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या सीमा दाखवल्या आहेत पण नकाशातून दोघांचीही नावे गायब आहेत.

रिपोर्ट्सनुसार, या चिनी भाषेतील नकाशांमध्ये लक्झेंबर्गसारख्या छोट्या देशाचे नाव आहे. परंतु इस्रायलसारख्या महत्त्वाच्या देशाचे नाव नसणे अनेक प्रश्न निर्माण करत आहे. अलीबाबा किंवा Baidu या दोघांनीही या विषयावर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. चीन सरकारने इस्रायल-हमास युद्धाबाबत जारी केलेल्या निवेदनात हमासच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला नसून पॅलेस्टाईनचे समर्थन करण्यात आले आहे, हे विशेष. यावरून चीनला टीकेलाही सामोरे जावे लागले. 

चीनच्या नकाशांमधून इस्रायलचे नाव आधीच गायब होते की ७ ऑक्टोबरनंतर सुरू झालेल्या युद्धानंतर ते काढून टाकण्यात आले होते का हे स्पष्ट झालेले नाही. चीन सरकार आपल्या देशाच्या नकाशांबाबत अनेकदा गदारोळ घालते. विविध हॉटेल्सच्या संकेतस्थळांवर जरी दक्षिण चीन समुद्र हा चीनच्या नकाशावर वादग्रस्त म्हणून दाखवला जात असला, तरी चीन सरकारचा त्यावर तीव्र आक्षेप आहे. त्याचबरोबर एक संपूर्ण देश इस्रायल चीनच्या नकाशावरून गायब करण्यात आला आहे, परंतु अद्यापपर्यंत चीन सरकारने यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

Web Title: China erases Israel's name from the map; The reason behind the commotion is still unclear!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.