चीनने निश्चित केला ६.५ टक्के वृद्धीदर
By admin | Published: March 6, 2017 04:20 AM2017-03-06T04:20:39+5:302017-03-06T04:20:39+5:30
जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था चीनने २०१७ साठी जीडीपीचा वृद्धीदर ६.५ टक्के निश्चित केला आहे.
Next
बीजिंग : जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था चीनने २०१७ साठी जीडीपीचा वृद्धीदर ६.५ टक्के निश्चित केला आहे. चीनने मागील वर्षी ६.५ ते ७ टक्के वृद्धीदराचे लक्ष्य ठेवले होते. चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या वार्षिक सत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान ली क्विंग यांनी हा अहवाल सादर केला. यात जीडीपीचा वृृद्धीदर ६.५ निश्चित करण्यात आला आहे. २०१६ मध्ये चीनचा वृद्धीदर ६.७ टक्के होता. २६ वर्षांतील हा सर्वात नीचांकी दर होता. २०१५ मध्ये चीनचा वृद्धीदर ६.९ टक्के होता. यावर्षी चीनने शहरी भागात १.१ कोटी रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. २०१६ च्या तुलनेत हे लक्ष्य दहा लाखांनी अधिक आहे.