CoronaVirus Live Updates : चीनमधील लॉकडाऊनला पाकिस्तान कारणीभूत; 26 चिनी अधिकाऱ्यांना होणार शिक्षा, नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 12:34 PM2021-12-25T12:34:27+5:302021-12-25T12:44:47+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: चीनमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमागे पाकिस्तान कारणीभूत असल्याची माहिती आता समोर आली आहे.

china flight from pakistan became reason for lockdown in china government punished officers | CoronaVirus Live Updates : चीनमधील लॉकडाऊनला पाकिस्तान कारणीभूत; 26 चिनी अधिकाऱ्यांना होणार शिक्षा, नेमकं काय घडलं? 

CoronaVirus Live Updates : चीनमधील लॉकडाऊनला पाकिस्तान कारणीभूत; 26 चिनी अधिकाऱ्यांना होणार शिक्षा, नेमकं काय घडलं? 

Next

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 27 कोटींचा टप्पा पार केला आहे.चीनच्या वुहानमधून कोरोनाचा वेगाने प्रसार झाल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला बऱ्यापैकी यश आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे. चीनने जगाचं टेन्शन वाढवलं असून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनने शियान शहरामध्ये कठोर निर्बंध लागू करत लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

चीनमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमागे पाकिस्तान कारणीभूत असल्याची माहिती आता समोर आली आहे. चीनमधील शियान शहरातील नागरिकांना घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आलेत. तसेच आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी घरातील एकाच व्यक्तीला दिवसाआड बाहेर पडण्याची मूभा देण्यात आली आहे. कडक लॉकडाऊनची घोषणा करतानाच चीनने आपल्या काही अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावली आहे. चीनमध्ये अचानक कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होण्यामागे अप्रत्यक्षपणे पाकिस्तान कनेक्शन असल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानमधून आलेलं एक विमान चीनमधील कोरोनाच्या या प्रसारासाठी जबाबदार असल्याचं सांगण्यात येत आहे.

शियानमधील 26 अधिकाऱ्यांना ठरवलं दोषी 

चीनच्या केंद्रीय अनुशासन निरीक्षण आयोगाने जारी केलेल्या एका वक्तव्यानुसार शियानमधील 26 अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. चांगलं काम न केल्याप्रकरणी 26 जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यांना शिक्षाही सुनावण्यात येणार आहे. मात्र ही शिक्षा काय असेल याबद्दलची सविस्तर माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. चीनने दिलेल्या माहितीनुसार, सरकारी अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी तसं केलं नाही. आता अशाच काही बेजबाबदार लोकांमुळे एक कोटीहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शियान शहरामध्ये लॉकडाऊन करावा लागला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचं संकट; 1.3 कोटी लोकसंख्येच्या शहरात कडक लॉकडाऊन

एक कोटी 30 लाख लोकसंख्या असलेलं हे शहर आहे. कोरोनाचा धोका असल्याने अगदीच अत्यावश्यक कामासाठी शहराबाहेर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठीही सरकारकडून विशेष परवाना जारी करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. चीनसमोर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचं आव्हान आहे. फेब्रुवारी महिन्यात असणाऱ्या विंटर ऑलिपिक खेळांसाठी जगभरातील वेगवेगळ्या देशांमधून खेळाडू चीनमध्ये दाखल होणार आहेत. चीन सध्या डेल्टा आणि ओमायक्रॉनचा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पूर्ण तयारी करत असल्याचं चित्र दिसत आहे. येथे लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात असे आदेश देण्य़ात आले आहेत.

 

Web Title: china flight from pakistan became reason for lockdown in china government punished officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.