अमेरिकेच्या एकाच निर्णयाने चीन बिथरला; तैवानला दिली हल्ल्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 20:01 IST2020-05-29T19:51:26+5:302020-05-29T20:01:42+5:30
चिनी सैन्याचे चीफ ऑफ जॉइंट स्टाफ डिपार्टमेन्ट आणि केंद्रीय सैन्य आयोगाचे सदस्य ली जुओचेंग शुक्रवारी म्हणाले, 'शांततेच्या मार्गाने एकीकरणाची शक्यता नष्ट झाली, तर सर्वप्रकारचे आवश्यक पावले उचलले जातील.

अमेरिकेच्या एकाच निर्णयाने चीन बिथरला; तैवानला दिली हल्ल्याची धमकी
बिजिंग : संपूर्ण जगात कोरोनाचा सामना करण्यात व्यस्त आहे. मात्र, चीन शेजारील देशांच्या कुरापती काढत आहे. आता चीनने तैवानवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. चीनच्या एका वरिष्ठ जनरलने म्हटले आहे, की तैवानला स्वतंत्र राहण्यापासून रोखण्याचा इतर कुठलाही मार्ग नसेल, तर त्याच्यावर हल्ला केला जाईल. यावर तैवाननेही चीनला चोख उत्तर दिले आहे. युद्धाची धमकी देणे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघण असल्याचे तैवानने म्हटले आहे.
चिनी सैन्याचे चीफ ऑफ जॉइंट स्टाफ डिपार्टमेन्ट आणि केंद्रीय सैन्य आयोगाचे सदस्य ली जुओचेंग शुक्रवारी म्हणाले, 'शांततेच्या मार्गाने एकीकरणाची शक्यता नष्ट झाली, तर सर्वप्रकारचे आवश्यक पावले उचलले जातील. ली जुओचेंग बिजिंगच्या ग्रेट हॉलमधील एका कार्यक्रमातही म्हणाले होते, 'आम्ही बल प्रयोग सोडण्याचे वचन देत नाही आणि तैवानमध्ये स्थिरता ठेवण्यासाठी सर्वप्रकारचे आवश्यक उपाय खुले ठेवणार आहोत.'
"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'
जुओचेंग यांच्या वक्तव्यावर तैवानच्या चीन प्रकरणांशी संबंधित असलेल्या परिषदेने म्हटले आहे, 'तैवानचे नागरिक हुकूमशाही आणि हिंसेची निवड कधीही करणार नाही. समस्या सोडविण्याचा मार्ग बल प्रयोग आणि एकतरफी निर्णय असू शकत नाही.' चीनसाठी तैवान प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. चीन या बैटाला आपा भाग मानतो. चीनने अनेक वेळा म्हटले आहे, की गरज पडल्यास तैवानला बळाच्या सहाय्याने अधिपत्याखाली घेतले जाईल.
भारत-चीन सीमावाद : ट्रम्प यांनी लक्ष घालताच चीनचा सूर बदलला, सुरू झाली 'हिंदी-चिनी भाई-भाई'ची भाषा
अमेरिकेने घेतला असा निर्णय -
अमेरिकेने काँग्रेसला (संसद) सूचित केले आहे, की ते तैवानला 18 कोटी डॉलर्सच्या अत्याधुनिक टॉरपीडोची संभाव्य विक्री करू शकतात. अमेरिकेच्या संरक्षण सहकार्य एजेन्सीने नुकतेच सांगितले होते, की अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने तैवानला 18 एमके-48 मॉड 6 टॉरपीडो आणि संबंधित उपकरणांची विक्री करण्यासाठी मंजुरी दिली आहे. यानंतर चीनने असे पाऊल उचलले आहे.
कोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक