VIDEO : घराच्या छतावर लटकलेलं दिसलं लांब केस असलेलं डोकं, सत्य समोर आल्यावर बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 12:46 PM2021-09-01T12:46:04+5:302021-09-01T12:47:50+5:30

स्थिती इतकी वाईट होती की, लोकांना काहीतरी अघटीत घडेल अशी शक्यता जाणवत होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक हैराण झाले आहेत. 

China girl head stuck in ceiling viral shocking news watch viral video | VIDEO : घराच्या छतावर लटकलेलं दिसलं लांब केस असलेलं डोकं, सत्य समोर आल्यावर बसला धक्का

VIDEO : घराच्या छतावर लटकलेलं दिसलं लांब केस असलेलं डोकं, सत्य समोर आल्यावर बसला धक्का

Next

घरात लहान मुले असतील तर किती काळजी घ्यावी लागते हे सर्वांनाच माहीत आहे. पण प्रत्येक वेळी अलर्ट राहणं शक्य होत नाही आणि नेमकी त्याचवेळी दु:खद घटना घडते. चीनमध्ये घडलेल्या एका घटनेने लोकांना विचार करण्यास भाग पाडलं आहे. स्थिती इतकी वाईट होती की, लोकांना काहीतरी अघटीत घडेल अशी शक्यता जाणवत होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक हैराण झाले आहेत. 

सीलिंगवर लटकली विचित्र गोष्ट

ही घटना चीनच्या गुइझोउ प्रांताच्या पुडिंग काउंटीमधील एका घरात घडली होती. इथे सीलिंगवर एक्सट्रॅक्टर फॅन लावण्यासाठी ८ इंचाचं छिद्र करण्यात आलं होतं. याची माहिती घरातील राहणाऱ्या लहान मुलीला नव्हती. उत्सुकतेमुळे ती छिद्रातून डोकावण्याचा प्रयत्न करत होती आणि यादरम्यान तिचं डोकं त्यात अडकलं. घरातील लोकांचं लक्ष जेव्हा छताकडे गेलं तेव्हा त्यांना धक्का बसला. हे दृश्य कोणत्याही हॉरर सिनेमातील सीनपेक्षा कमी नव्हतं.

सत्य समोर आल्यावर धडकी भरली

घरातील लोकांनी सीलिंगवर लटकलेल्या केसांचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तेही हैराण झाले. ते त्यांच्या मुलीचं डोकं होतं. जे सीलिंगमधील छिद्रात अडकलं होतं. त्यांनी मुलीचं डोकं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना काही यश आलं नाही. त्यांनी लगेच फायर फायटर्सना बोलवलं. प्रोफेशनल टीम येताच कामाला लागली आणि त्यांनी मुलीला बाहेर काढण्यासाठी अनेक उपाय केले.

खायच्या तेलाची घेतली मदत

फायर फायटर्सनी आधी मुलीचं अडकलेलं डोकं हातानेच बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी सोबत आणलेल्या उपकरणांचा वापर केला. पण मुलीचं डोकं असं काही अडकलं होतं की, त्या उपकरणांचीही काही मदत झाली नाही. अखेर खायच्या तेलाचा वापर केला आणि मुलीचं डोकं बाहेर काढण्यात यश आलं.
 

Web Title: China girl head stuck in ceiling viral shocking news watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.