चीनमध्ये सापडला सोन्याचा सर्वात मोठा खजिना; किंमत एवढी की, ऐकून बसेल धक्का..!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 05:30 PM2024-11-22T17:30:09+5:302024-11-22T17:30:20+5:30
China Gold Reserves Update: चीन जगातील सर्वात मोठा सोने उत्पादक देश आहे.
China Gold Reserves:चीन हा जगातील सर्वात मोठा सोने उत्पादक देश आहे. आता चीनला सोन्याचा आणखी मोठा खजिना सापडला आहे. चीनला त्यांच्या हुनान प्रांतात 82.8 अब्ज डॉलर्स इतका मोठा सोन्याचा साठा सापडला असून, त्याचे भारतीय रुपयातील मूल्य अंदाजे 7 लाख कोटी रुपये आहे. हुनान अकादमी ऑफ जिओलॉजीने पिंगजियांग काउंटीमध्ये 40 हून अधिक सोन्याचे परिसर आढळले आहेत, ज्यात 300.2 टन सोने असल्याचा अंदाज आहे.
रॉयटर्सने चीनच्या राज्य एजन्सीच्या हवाल्याने सांगितले की, हुनान प्रांताच्या मध्यभागी ड्रॅगनला 82.9 अब्ज डॉलर्स किमतीचे सोन्याचे प्रचंड साठे सापडले आहेत, जे 600 अब्ज युआनच्या समतुल्य आहे. हुनान अकादमी ऑफ जिओलॉजीने पिंग्झियांग काउंटीमध्ये 2,000 मीटरपेक्षा जास्त खोलीवर 40 हून अधिक ठिकाणी सोन्याचा शोध लावला आहे. यामध्ये 300.2 टन सोन्याचे स्त्रोत आहेत. चीनच्या सरकारी एजन्सी शिन्हुआच्या अंदाजानुसार, 3,000 मीटरपेक्षा जास्त खोलीवर 1,000 टनांपेक्षा जास्त सोन्याचा साठा मिळू शकतो.
चीन सोन्याचा सर्वात मोठा उत्पादक
चीन हा जगातील सर्वात मोठा सोने उत्पादक देश आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या मते, 2023 मध्ये जागतिक सोन्याच्या उत्पादनात चीनचे योगदान 10 टक्के आहे. असे असतानाही जागतिक स्तरावर वाढत्या भू-राजकीय तणावानंतर चीनच्या सेंट्रल बँकेने सर्वाधिक सोने खरेदी केले आहे. 2023 मध्ये पीपल्स बँक ऑफ चायनाने सोन्याची खरेदी 20 टक्क्यांनी वाढवली. जागतिक सुवर्ण परिषदेच्या मते, सर्व केंद्रीय बँकांनी 1087 टन सोन्याची खरेदी केली, त्यापैकी चीनने सर्वाधिक खरेदी केली. 2024 च्या पहिल्या तिमाहीत चीनने 280 टन सोने खरेदी केले, तर यावर्षी आतापर्यंत चीन 850 टन सोने खरेदी करेल, असा अंदाज आहे.