अटक करण्यात आलेल्या भारतीयाची चीनने अखेर केली सुटका

By admin | Published: July 18, 2015 10:09 AM2015-07-18T10:09:10+5:302015-07-18T10:16:21+5:30

दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या भारतीयाची चीनने अखेर सुटका केली आहे.

China has finally arrested the arrested Indians | अटक करण्यात आलेल्या भारतीयाची चीनने अखेर केली सुटका

अटक करण्यात आलेल्या भारतीयाची चीनने अखेर केली सुटका

Next

ऑनलाइन लोकमत

बीजिंग, दि. १८ - दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या भारतीयाची चीनने अखेर सुटका केली आहे. त्या नागरिकाला पुन्हा मायदेशीही पाठवण्यात आले आहे. 

राजीव मोहन कुलश्रेष्ठ ( वय ४६) असे त्या भारतीय नागरिकाचे नाव असून ते अन्य १९ विदेशा नागरिकांसोबत चीनला आले होते. इनर मंगोलिया प्रातांतील ओरदोस येथील हॉटेलच्या खोलीत बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांचे व्हिडीओ पहात असल्याचे आढळल्यानंतर कुलश्रेष्ठ यांच्यासह २० जणांना अटक करण्यात आली होती. त्यातील ११ जणांची सुटका झाली होती, मात्र कुलश्रेष्ठ यांच्यासह आणखी आठ जणांना चीन प्रशासनाने ताब्यात ठेवले होते, त्यात ब्रिटीश व दक्षिळ आफ्रिकन नागरिकांचाही समावेश होता. 

अखेर कुलश्रेष्ठ यांचीही सुटका करण्यात आली असून ते मायदेशी परतत आहेत. 


 
 

Web Title: China has finally arrested the arrested Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.