PLAचं सैन्य LAC जवळ पोहोचलं, अमेरिकेचा चीनला इशारा अन् भारताला सतर्कतेचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 03:32 PM2020-06-02T15:32:29+5:302020-06-02T15:34:28+5:30
गेल्या काही आठवड्यापासून लडाख आणि उत्तर सिक्कीमच्या बर्याच भागात चिनी आणि भारतीय सैन्याची उपस्थिती वाढली आहे
वॉशिंग्टनः गेल्या काही दिवसांपासून चीनचा आक्रमकपणा वाढताना पाहायला मिळतोय. चीननंभारताच्या लडाखजवळ मोठ्या प्रमाणात सैन्य तळ उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतही चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे अशा परिस्थितीत चीनवर वारंवार आंतरराष्ट्रीय स्तरावरून टीका होत आहे. चीन हुकूमशाही राजवटीसारखा वागत असून, चीननं वास्तविक नियंत्रण रेषेच्या एलएसीजवळ सैन्य पाठवले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ हे AEIच्या पॉडकॉस्ट कार्यक्रम What The Hell Is Going On?मध्ये बोलत होते, त्यांनी चीनवर हल्लाबोल केला आहे. उत्तर भारताच्या सीमेच्या वास्तविक नियंत्रण रेषेजवळ चीन आपली लष्करी उपस्थिती वाढवत आहे, हे आपण सतत पाहत आहोत. गेल्या काही आठवड्यापासून लडाख आणि उत्तर सिक्कीमच्या बर्याच भागात चिनी आणि भारतीय सैन्याची उपस्थिती वाढली आहे, ज्यामुळे दोन्ही देशांच्या सैन्यामधील तणाव समोर आला आहे.
चीनच्या आक्रमक वृत्तीवर पॉम्पिओ म्हणाले की, कोरोना व्हायरसने पसरलेल्या कोरोनाच्या साथीच्या रोगाबद्दल चीन जगभर आपल्या भूमिकेनं लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. हाँगकाँगमध्ये तो लोकांच्या स्वातंत्र्यावर हल्ला करीत आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या या टप्प्यांमधून त्यांचा भयंकर चेहरा स्पष्ट दिसून येतो आहे. चीन बौद्धिक मालमत्ता चोरून दक्षिण चिनी समुद्रात आपली उपस्थिती वाढवित आहेत. अशी पावले अधिराज्यवादी राजवट उचलत असतात आणि ते काय करीत आहेत, याचा चिनी लोकांवर किंवा एकट्या हाँगकाँगच्या लोकांवर किती विपरीत परिणाम होणार आहे, याचा त्यांनी विचारही केलेला दिसत नाही. त्याचा संपूर्ण जगावरही वाईट परिणाम होणार असल्याचा इशाराही माइक पॉम्पिओ यांनी दिला आहे.
हेही वाचा
लग्नासाठी मागितलं स्वातंत्र्य; सरकारनं दिला 'क्रूर' झटका! भयानक आहे सौदीतील महिलांचं आयुष्य
राज्यात सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा सक्तीची, ठाकरे सरकारचा निर्णय
CoronaVirus : भारत लढा जिंकणारच! DRDOकडून कोरोनावर औषध तयार; लवकरच घेणार चाचणी