चीन परदेशांत दुतावास नाही, पोलीस स्टेशन उभारू लागला; कॅनडा, आयर्लंडमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 07:38 PM2022-09-26T19:38:45+5:302022-09-26T19:40:50+5:30

ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या संशोधक डारिया इम्पोम्बॅटो यांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे.

China has started building police stations At Abroad; problem in Canada, Ireland | चीन परदेशांत दुतावास नाही, पोलीस स्टेशन उभारू लागला; कॅनडा, आयर्लंडमध्ये खळबळ

चीन परदेशांत दुतावास नाही, पोलीस स्टेशन उभारू लागला; कॅनडा, आयर्लंडमध्ये खळबळ

Next

चीनचा विस्तारवाद आणि औद्योगिक साम्राज्यवादामुळे आधीच जग त्रस्त झाले आहे. यातच आता चीन परदेशांत केवळ दुतावासच नाही तर पोलीस ठाणीदेखील उघडू लागला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. चीनच्या दाव्यानुसार ही पोलीस स्टेशन आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांवर प्रतिबंध करण्यास सक्षम आहेत. परंतू, याच्या मागून वेगळ्याच हालचाली होऊ लागल्या आहेत. 

चीनच्या या पोलिसांच्या चौक्या कॅनडा, आयर्लंडसह जगभरातील अनेक देशांमध्ये उघडल्या गेल्या आहेत. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार कॅनडाभरात फुजौ पब्लिक सिक्युरिटी ब्युरो (PSB) शी संबंधीत पोलीस ठाणी उघडण्यात आली आहेत. यापैकी तीन पोलीस ठाणी ग्रेटर टोरंटोमध्ये आहेत. आयर्लंडच्या डब्लिनमध्ये अशीच चिनी पोलीस ठाणी उघडण्यात आली आहेत. 

या चौक्या केवळ बेकायदेशीर नाहीत, तर चीनच्या विरोधकांना छळण्यासाठी त्या उभारण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर या पोलीस चौक्यांच्या मदतीने चीन सरकार संबंधित देशांतील निवडणुकांवरही प्रभाव टाकत आहे. चीनचा दावा आहे की या पोलीस चौक्या परदेशात राहणाऱ्या चीनी नागरिकांना स्थानिक पोलीस मदत आणि इतर नोकरशाही प्रक्रिया दाखल करण्यात मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आल्या आहेत. चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारांना चीनमध्ये परत पाठवण्यास भाग पाडण्यात या पोलीस ठाण्यांचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. 230,000 हून अधिक लोकांना चीनमध्ये पाठवण्यात आल्याचा दावा सेफगार्ड डिफेंडर्स या संघटनेने केला आहे.

ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या संशोधक डारिया इम्पोम्बॅटो यांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. परदेशात राहणारे चिनी नागरिक नेहमीच सावध असतात, कारण त्यांना माहिती आहे की त्यांनी उलट सुलट काही केले तर त्याचे परिणाम त्यांच्या कुटुंबाला देखील भोगावे लागू शकतात. त्यांना जबरदस्तीने माघारी पाठवले जाऊ शकते किंवा त्यांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. कॅनडासारख्या देशांमध्ये चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या वाढत्या प्रभावावरही त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.

अनेक परदेशी मीडियांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चीनी अधिकारी नातेवाईकांची भरती करण्यासाठी, मुलांचे शोषण करण्यासाठी आणि सरकारविरोधी चिनी नागरिकांना जबरदस्तीने त्यांच्या देशात पाठवण्यासाठी कुरघोड्या करत आहे. 

Web Title: China has started building police stations At Abroad; problem in Canada, Ireland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन