सुपर पॉवर अमेरिकेलाही मागे टाकलं; जगात सर्वात टॉपचं स्थान चीननं पटकावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 09:39 PM2021-11-16T21:39:01+5:302021-11-16T21:39:57+5:30

मागील २० वर्षांचा आकडा पाहिला तर अमेरिकेची संपत्ती दुप्पट झाली आहे. अमेरिकेत मालमत्तेचे दर जास्त न वाढल्याने ही संपत्ती चीनच्या तुलनेत कमी आहे

China has surpassed the United States to become the world's richest country | सुपर पॉवर अमेरिकेलाही मागे टाकलं; जगात सर्वात टॉपचं स्थान चीननं पटकावलं

सुपर पॉवर अमेरिकेलाही मागे टाकलं; जगात सर्वात टॉपचं स्थान चीननं पटकावलं

Next

नवी दिल्ली – सुपर पॉवर अमेरिकेला(America) मागे सोडत चीन(China) जगातील सर्वात श्रीमंत देश बनला आहे. मागील २० वर्षांत चीनच्या संपत्तीत वेगाने वाढ झाली आहे. त्या तुलनेत अमेरिकेची संपत्ती कासवगतीने वाढत आहे. कंसल्टेंसी फर्म Mckinsey एँन्ड कंपनीच्या ताज्या रिपोर्टमधून हा खुलासा झाला आहे. मागील २ दशकात जगाची संपत्ती ३ टक्क्यांनी वाढली आहे.

या रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे, जगात ३ टक्के संपत्ती वाढली आहे परंतु यात सर्वाधिक हिस्सा चीनचा आहे. चीनचा एक तृतियांश म्हणजे ३३ टक्के भाग आहे. चीनची संपत्ती २ दशकात १६ पटीनं वाढली आहे. २००० मध्ये जगाची एकूण संपत्ती जवळपास १५६ ट्रिलियन डॉलर होती. ती २०२० मध्ये वाढून ५१४ ट्रिलियन डॉलर इतकी झाली. परंतु या एक तृतियांश भाग एकट्या चीनचा आहे. कंसल्टेंसी फर्मने जगातील ६० टक्के उत्पन्न असणाऱ्या टॉप १० देशांची बॅलेन्सशीट तपासून हा रिपोर्ट तयार केला आहे.

मागील २० वर्षांत चीनच्या अर्थसंकल्पात वाढ झाली आहे. २००० मध्ये चीन वर्ल्ड ट्रेड ऑर्गनाइजेशनचा सदस्य बनला होता. त्यावेळी चीनची संपत्ती ७ ट्रिलियन डॉलर होती. जी मागील २० वर्षांत वाढून १२० ट्रिलियन डॉलर झाली आहे. म्हणजे अवघ्या २० वर्षात चीनच्या संपत्तीत ११३ ट्रिलियन डॉलर्सची वाढ झाली आहे. मागील २० वर्षांत चीनच्या तुलनेत अमेरिकेच्या संपत्तीत खूप कमी वाढ झाली आहे. २०२० मध्ये अमेरिकेची एकूण संपत्ती ९० ट्रिलियन डॉलर्स आहे.

मागील २० वर्षांचा आकडा पाहिला तर अमेरिकेची संपत्ती दुप्पट झाली आहे. अमेरिकेत मालमत्तेचे दर जास्त न वाढल्याने ही संपत्ती चीनच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे अमेरिकेचा पहिला क्रमांक चीननं हिसकावून घेतला आहे. विशेष म्हणजे अमेरिका आणि चीन जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेले देश आहेत. या दोन्ही देशांच्या दोन तृतियांश अधिक संपत्ती श्रीमंत १० टक्के लोकांकडे आहे. जगातील ६८ टक्के संपत्ती रिएल इस्टेटमध्ये गुंतवली आहे. तर बाकी मालमत्ता विकास, मशीनरी अँन्ड इक्विवपमेंट, इंटलेक्चुअर प्रॉपर्टी आणि पेटेंटंस आहेत.  

Web Title: China has surpassed the United States to become the world's richest country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.