चीनचे अमेरिकेकडे दुर्लक्ष, दक्षिण चीन सागरात पाठवल्या युद्धनौका
By admin | Published: September 5, 2016 10:51 PM2016-09-05T22:51:44+5:302016-09-05T22:51:44+5:30
अमेरिकेच्या इशा-याकडे दुर्लक्ष करुन चीनने दक्षिण चीनच्या समुद्रात मोठया प्रमाणावर युद्धनौका पाठवल्या आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
बिजींग, दि. ५ - अमेरिकेच्या इशा-याकडे दुर्लक्ष करुन चीनने दक्षिण चीनच्या समुद्रात मोठया प्रमाणावर युद्धनौका पाठवल्या आहेत. फिलीपाईन्सच्या किना-यापासून जवळच या नौका मागच्या आठवडयापासून उभ्या आहेत. फिलीपाईन्सच्या शोअल किना-यापासून मैलभराच्या अंतरावर चीनी नौदल आणि तटरक्षक दलाच्या युद्धनौका उभ्या आहेत.
दक्षिण चीनच्या मालकी हक्कावरुन चीनचा अनेक देशांबरोबर वाद सुरु आहे. त्यात फिलीपाईन्सही आहे. अलीकडेच आंतरराष्ट्रीय लवादाने दक्षिण चीन समुद्राच्या मालकी हक्कावरुन चीनच्या विरोधात निकाल दिला होता. चीनच्या हांगझौमध्ये जी-२० देशांची बैठक झाली. शनिवारीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये चर्चा झाली.
मार्च महिन्यात वॉशिंग्टनमध्ये झालेल्या भेटीच्यावेळी ओबामांनी जिनपिंग यांना शोअलमध्ये चीनने कुत्रिम बेट उभारु नये असे बजावले होते. जी-२० परिषदेनंतर चीन काय पावले उचलतो यावर अमेरिकेचे लक्ष आहे. दक्षिण चीन सागराच्या मालकीवरुन चीनचे अनेक शेजारी देशांबरोबर वाद सुरु आहेत. त्यात व्हिएतनामचाही समावेश होता.