अमेरिकेच्या जीपीएसला टक्कर देण्यासाठी चीननं लॉन्च केलं बीडीएसचं अखेरचं सॅटेलाइट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 09:18 PM2020-06-23T21:18:36+5:302020-06-23T21:21:32+5:30
अमेरिकेच्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस), रशियाच्या ग्लोनास आणि युरोपीय संघाच्या गॅलीलिओला टक्कर देणे, हा बायडू लॉन्च करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. भारतही 'इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम' या नावाने स्वतःचे नेव्हिगेशन सिस्टिम तयार करत आहे.
बिजिंग :चीनने मंगळवारी अमेरिकेच्या जीपीएस नेटवर्क प्रमाणेच तयार केलेल्या बायडू नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टमचे (बीडीएस) अखेरचे सॅटेलाइट लॉन्च केले आहे. नेव्हिगेशनच्या अब्जावधी डॉलर्सच्या आकर्षक बाजारात भागीदारीसाठी चीनचा हा प्रयत्न म्हणजे, एक मोठे पाऊल मानले जात आहे.
नैऋत्य सिचुआन प्रांतातून हे सेटेलाइट लॉन्च करण्यात आले -
नैऋत्य सिचुआन प्रांतातून लॉन्च करण्यात आलेल्या या सॅटेलाइटचे फुटेज सरकारी सीसीटीव्हीने प्रसारित केले आहे. यात दिसत होते, हिरव्यागार पहाडांमध्ये एक रॉकेटवर जात आहे. आणि काही दर्शक आपल्या मोबाईल फोनच्या सहाय्याने याचा व्हिडिओ तयार करत आहेत. यापूर्वी हे सॅटेलाइट 16 जूनला लॉन्च करण्यात येणार होते. मात्र काही तांत्रिक कारणास्तव अखेरच्या वेळेला याचे प्रक्षेपण रद्द करण्यात आले होते.
चीनच्या दादागिरीला भारताचं चोख उत्तर, टक्कर देण्यासाठी तयार केलं जबरदस्त 'चक्रव्यूह'
अमेरिकेच्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस), रशियाच्या ग्लोनास आणि युरोपीय संघाच्या गॅलीलिओला टक्कर देणे, हा बायडू लॉन्च करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. भारतही 'इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम' या नावाने स्वतःचे नेव्हिगेशन सिस्टिम तयार करत आहे. याचे कोड नेम - एलएव्हीआयसी, असे ठेवण्यात आले आहे. तर पाकिस्तानसारखे काही देश बीडीएसचा वापर करत आहेत. तसेच चीन 'वन बेल्ट-वन रोड'ला समर्थन देणाऱ्या देशांनाही हे वापरण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
सानिया मिर्झाच्या पतीवर कोरोनाचं संकट! आज येईल रिपोर्ट; ...तरच मिटेल 'लंबी जुदाई'
पहिल्या बायडू सॅटेलाइटने 2,000मध्ये केला होता कक्षेत प्रवेश -
पहल्या बायडू सॅटेलाइटने वर्ष 2,000मध्ये कक्षेत प्रेवेश केला होता. तसेच डिसेंबर 2012 मध्ये आशिया-प्रशांत भागात, चीन स्थानिक यूझर्सना पोझिशनिंग, नेव्हिगेशन, टायमिंग आणि मॅसेजिंगची सेवा देत आहे. याशिवाय 2018च्या अखेरपासून बीडीएस प्रणालीने जागतीक सेवा प्रदान करायलाही सुरुवात केली आहे.
फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!