ड्रॅगनची दहशत! चीनने बनवले १ हजार अणुबॉम्ब अन् अमेरिकेपर्यंत पोहोचणारी मिसाइल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 05:01 PM2021-02-02T17:01:24+5:302021-02-02T17:04:04+5:30

अमेरिकेला धोपीपछाड देत जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या चीनने आपल्या खतरनाक मनसुब्यांना पूर्ण करण्यासाठी तयारी सरू केली

china Made 1000 Nuclear Bombs For Destruction In Us And World Increasing Stock Of Icbm Missiles | ड्रॅगनची दहशत! चीनने बनवले १ हजार अणुबॉम्ब अन् अमेरिकेपर्यंत पोहोचणारी मिसाइल

ड्रॅगनची दहशत! चीनने बनवले १ हजार अणुबॉम्ब अन् अमेरिकेपर्यंत पोहोचणारी मिसाइल

Next

अमेरिकेला धोपीपछाड देत जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या चीनने आपल्या खतरनाक मनसुब्यांना पूर्ण करण्यासाठी तयारी सरू केली आहे. चीनने तब्बल १ हजार अणुबॉम्ब तयार केले असून यातील १०० अणुबॉम्ब तात्काळ वापरासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. इतकंच नव्हे, तर हवेतून दूरवार मारा करणाऱ्या मिसाइल तयार करण्याची जोरदार तयारी चीनने सुरू केली  आहे. 

ड्रॅगनचा दगा! चीनने शब्द फिरवला, सीमेवर पुन्हा तणाव वाढण्याची चिन्हे; भारत सज्ज

अमेरिका आणि रशियाला मागे टाकत चीनने आपल्या शस्त्रसाठ्यात पुढील पाच वर्ष आणखी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील एकूण अण्वस्त्रांपैकी ९० टक्के अण्वस्त्र ही केवळ अमेरिका आणि रशियाकडे आहे, अशी माहिती साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिली आहे. १९८० च्या दशकात सोव्हियत रशिया आणि अमेरिकेकडे १० हजारांहून अधिक अणूबॉम्ब होते. त्यात आता घट होऊन अनुक्रमे ६५०० आणि ५००० इतके करण्यात आले आहेत. शांततेच्या करारानुसार यात आणखी घट करुन अणुबॉम्बची संख्या प्रत्येकी १५५० पर्यंत आणण्याचा उद्दीष्ट दोन्ही देशांचं आहे. अमेरिका आणि रशियानं आपल्याकडी अण्वस्त्रांची माहिती जाहीर केली असताना चीनने मात्र याबाबत कोणतीही माहिती जाहीर करणं टाळलं आहे. 

चीनकडे १ हजार अणुबॉम्ब
सिप्रीच्या अहवालानुसार चीनकडे एकूण ३२० अणुबॉम्ब आहेत. पण चीन सैन्यातील सुत्रांच्या माहितीनुसार देशाकडे एकूण १ हजार अणुबॉम्ब असल्याची माहिती समोर आली आहे. यातील १०० अणुबॉम्ब चीनने तात्काळ वापरासाठी सज्ज ठेवले आहेत. युद्धजन्य परिस्थितीतच हे अणुबॉम्ब चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या परवानगीनंतरच रॉकेट फोर्सच्या हवाली देण्यात येतील. रशिया आणि अमेरिकेतील सामंजस्य करारानंतर आता चीनला आपल्याकडील अण्वस्त्रांमध्ये वाढ करण्याची संधीच मिळाली असल्याचं जाणकार सांगतात. 

चीनची लष्करी ताकद ही आता अमेरिकेची डोकेदुखी

चीनकडे सध्या १०० अणुबॉम्ब वापरण्यायोग्य परिस्थितीत असून हे अमेरिकेतील सर्व शहरांना उद्ध्वस्त करण्यास पुरेसे ठरणारे नाहीत, असं हाँगकाँगचे सैन्य विशेतज्ज्ञ आणि चीनी सैन्याचे माजी अधिकारी सों झोंगपिंग यांनी सांगितलं. दरम्यान, चीनकडे असलेली सीजे-२० क्रूझ मिसाइलमध्ये हवाईमार्गानं अणुबॉम्ब डागता येण्याची क्षमता असल्याचं चीनी सरकारने २०१८ साली जाहीर केलं होतं. या मिसाइलची मारक क्षमता तब्बल २ हजार किलोमीटर इतकी आहे. त्यामुळे शस्त्रांच्याबाबतीत चीन आता अमेरिका आणि रशियाची बरोबरीपर्यंत येऊन पोहोचला आहे. 

Web Title: china Made 1000 Nuclear Bombs For Destruction In Us And World Increasing Stock Of Icbm Missiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.