चीनने तयार केली कोरोनावर 'सुपर वॅक्सीन'?; 10 लाख लोकांवर केली चाचणी पण 'नो साइड इफेक्ट'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 05:30 PM2020-11-22T17:30:12+5:302020-11-22T17:32:33+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: युद्धपातळीवर संशोधन सुरू असून अनेक ठिकाणी चाचण्यांना यश येत आहे. याच दरम्यान चीनने कोरोनावर 'सुपर वॅक्सीन' तयार केल्याचा दावा केला आहे.
बीजिंग - जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल पाच कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. युद्धपातळीवर संशोधन सुरू असून अनेक ठिकाणी चाचण्यांना यश येत आहे. याच दरम्यान चीनने कोरोनावर 'सुपर वॅक्सीन' तयार केल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत ही कोरोना लस तब्बल 10 लाख लोकांना दिली आहे. मात्र यापैकी कोणावरही कोणताही साइड इफेक्ट दिसला नाही. त्यामुळेच 'सुपर वॅक्सीन' असल्याचं म्हटलं जात आहे.
चीनी कंपनी सिनोफार्मने विकसित केलेल्या या लसीची सध्या अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू आहे. मात्र, चीन सरकारने आपत्कालीन परिस्थितीत ही लस वापरण्यास मंजुरी दिली आहे. आतापर्यंत ही लस दहा लाख जणांना देण्यात आली आहे. सिनोफार्मचे चेअरमन लियू जिंगजेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांना लस देण्यात आली. मात्र, त्यांच्यात कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत. काही लोकांनी एकदम छोट्या स्वरुपाच्या तक्रारी केल्या आहेत. परदेशातील आमच्या एका कार्यालयातील 99 पैकी 81 जणांना ही लस देण्यात आली.
कार्यालयात कोरोनाचा संसर्ग होत होता. त्यावेळी लस दिलेल्यांपैकी एकालाही कोरोनाची लागण झाली नाही. मात्र, ज्यांना लस टोचली नाही, अशांना काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. लियू जिंगजेन यांनी आपत्कालीन परिस्थितीत कामगार, विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. हे सर्वजण बाहेरच्या देशांमध्ये होते. या सर्वांना लस दिल्यानंतर एकालाही कोरोनाची लागण झाली नाही. याच महिन्यात सहा नोव्हेंबर रोजी चीनबाहेर जाण्याआधी जवळपास 56 हजार जणांनी लस घेतल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
CoronaVirus News : भय इथले संपत नाही! "देशातील 80 टक्के लोकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका"https://t.co/QxvWPGOn0J#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) November 22, 2020
सिनोफार्म कंपनीच्या कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी 10 देशांमध्ये सुरू आहे. या चाचणीत 60 हजार लोकांनी सहभाग घेतला आहे. यूएई, बहरीन, मिस्त्र, जॉर्डन, पेरू आणि अर्जेंटिना आदी देशांमध्ये ही लस चाचणी सुरू आहे. सिनोफार्म कंपनी एकाच वेळी दोन लस विकसित करत आहे. त्यामुळे दोन्हीपैकी कोणती लस अधिक प्रभावी ठरली आहे, याबाबत काहीही स्पष्टता नाही. अमेरिकेतील फायजर आणि मॉडर्नानंतर आता चीनची ही लस प्रभावशाली असल्याचा दावा केला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोना लसीसंदर्भात WHO प्रमुखांनी केलं मोठं विधानhttps://t.co/OmXoxiHCpR#coronavirus#CoronaVirusUpdates#coronavaccine#WHO
— Lokmat (@MiLOKMAT) November 17, 2020