भारताचं पाणी चीन पळवणार?; ड्रॅगनची नवी चाल, सीमेवर संघर्ष पेटण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 12:38 PM2023-07-19T12:38:27+5:302023-07-19T12:39:06+5:30

पॉवर कंस्ट्रेक्शन कॉर्पोरेशन ऑफ चाइनाने हा विद्युत जलप्रकल्प ऐतिहासिक संधी असल्याचे म्हटलंय.

China making worlds largest dam on Indias Brahmaputra river | भारताचं पाणी चीन पळवणार?; ड्रॅगनची नवी चाल, सीमेवर संघर्ष पेटण्याची चिन्हे

भारताचं पाणी चीन पळवणार?; ड्रॅगनची नवी चाल, सीमेवर संघर्ष पेटण्याची चिन्हे

googlenewsNext

बीजिंग – भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा दोन्ही देशांत संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. चीनने तिबेटमध्ये सीमेजवळ यारलुंग-त्संगपो नदीवर एक धरण बांधण्याची योजना आखत आहे. या नदीला भारतात ब्रह्मपूत्र नावाने ओळखलं जाते. ही सर्वात मोठी नदी आहे. भारत-चीन संबंधाचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक ब्रह्मा चेलानी यांनी या गोष्टीची पुष्टी केली आहे.

निक्केई एशियामध्ये याबाबत लेख आला आहे. त्यानुसार, चीन जगातील सर्वात मोठे धरण गुप्तरित्या बांधू शकत नाही. जर हे खरे असेल तर या धरणाची क्षमता ६० गीगावॉट इतकी आहे. हे धरण चीनच्या मेगा प्रोजेक्टचा एक भाग आहे. भारतानजीक सीमेवर चीनचे हे धरण आकार आणि क्षमतेने चीनमधीलच थ्री गॉर्जेस धरणाहून कित्येक पटीने मोठे असेल. थ्री गॉर्जेस धरणावर जगातील सर्वात मोठी विद्युत योजना आहे. ब्रह्मपूत्र नदीवर धरण बांधून चीनचा विद्युत निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. ज्याठिकाणाहून एक नदी भारतात येते. नोव्हेंबर २०२० मध्ये धरण बांधकामाची बातमी समोर आली होती. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये ही बातमी आली होती.

कैलास पर्वतातील एंगसी ग्लेशियरहून निघालेली आणि पूर्व हिमालयाला घेरा घातलेली ब्रह्मपूत्र नदी ३,६९६ किमी लांब आहे. भारताच्या सीमेपलीकडे चीनमध्ये या नदीला यारलुंग-त्संगपो नावाने बोलतात. ही नदी वेगवेगळ्या क्षेत्रातून पुढे जाते. तिबेटहून ही भारतात येते आणि शेवट बांग्लादेशात होतो. ११०० किलोमीटर पूर्वेला वाहून त्यानंतर अनेक नद्या या नदीला मिसळतात. हिमालयाच्या पूर्वेच्या टोकापासून पर्वतरांगा पार करून दरीखोऱ्यातून रस्ता बनवत चीनला क्रॉस करून दक्षिणेकडे वळण घेते. हा भाग एलएसी अंतर्गत येतो. ही जगातील नववी सर्वात मोठी नदी आहे.

भारतासाठी धोकादायक  

चीन यारलुंग-त्सांगपो नदीवर एक विद्युत प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न करतोय. ही नदी भारत आणि बांग्लादेशातूनही जाते. पॉवर कंस्ट्रेक्शन कॉर्पोरेशन ऑफ चाइनाने हा विद्युत जलप्रकल्प ऐतिहासिक संधी असल्याचे म्हटलंय. चीन भारतातील काही भागातील पाणी कमी करण्यासाठी नदीचा प्रवाह उत्तरेच्या दिशेने वळवू शकतो. जर असे झाले तर भारतासाठी ही स्थिती धोकादायक ठरू शकते.

Web Title: China making worlds largest dam on Indias Brahmaputra river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.