हाहाकार! चीनमध्ये नव्या व्हायरसमुळे विध्वंस; स्मशानभूमीत जागा नाही, रुग्णालयांत मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 10:33 IST2025-01-03T10:33:01+5:302025-01-03T10:33:36+5:30

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे.

china new virus hmpv known as human metapneumo virus create chaos heavy crowd at hospital | हाहाकार! चीनमध्ये नव्या व्हायरसमुळे विध्वंस; स्मशानभूमीत जागा नाही, रुग्णालयांत मोठी गर्दी

हाहाकार! चीनमध्ये नव्या व्हायरसमुळे विध्वंस; स्मशानभूमीत जागा नाही, रुग्णालयांत मोठी गर्दी

२०२० मध्ये जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) वेगाने पसरत आहे, ज्यामुळे रुग्णालयांमध्ये खूप गर्दी होत आहे आणि चीनमधील स्मशानभूमीत जागा नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या व्हायरसने चीनमध्ये कोरोनासारखा कहर केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या वृत्तानुसार, HMPV मुळे मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडत आहेत.

चीनी सोशल मीडियावर दावा केला जात आहे की HMPV, इन्फ्लूएंझा ए, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि COVID-19 सारखे अनेक व्हायरस एकाच वेळी रुग्णालयात पसरत आहेत. चीनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे आणि लोक चिंतेत आहे की, चीन सरकार या नवीन व्हायरसबद्दल योग्य माहिती देत ​​नाही. एनडीटीव्ही आणि रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चीनमधील आरोग्य अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

HMPV व्हायरस म्हणजे काय?

ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) हा RNA व्हायरस आहे, जो Pneumoviridae कुटुंबातील आहे. 2001 मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता. हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो आणि खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील ते वेगाने पसरू शकते. त्याच्या संसर्गाचा कालावधी ३ ते ५ दिवसांचा असतो आणि हिवाळ्यामध्ये हे सर्वात सामान्य आहे.

व्हायरसचं सॉफ्ट टार्गेट

HMPV चे मुख्य सॉफ्ट टार्गेट मुलं आणि वृद्ध आहेत. याच लोकांना कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक फटका बसला होता. व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांना मास्क घालण्याचा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा आणि वारंवार हात स्वच्छ करण्याचा सल्ला दिला आहे.

चीनच्या अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, हिवाळ्यात श्वासोच्छवासाच्या आजारांची प्रकरणं देशात झपाट्याने वाढू शकतात. चीनच्या रोग नियंत्रण अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितलं की, ते या आजारावर लक्ष ठेवत आहेत. चीनी सरकार व्हायरसशी संबंधित वास्तविक डेटा आणि परिस्थिती पूर्णपणे उघड करत नसल्याने चिंता वाढली आहे.

Web Title: china new virus hmpv known as human metapneumo virus create chaos heavy crowd at hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.