प्रेयसीच्या जाचाला कंटाळून प्रियकराने उचलले 'हे' पाऊल, पोलिसही झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 07:40 PM2021-09-03T19:40:56+5:302021-09-03T19:42:34+5:30

China news: प्रेससीच्या जाचाला कंटाळून प्रियकाराने तुरुंगात जाण्याचा निर्णय घेतला.

china news; Tired of his girlfriend's harassment, boyfriend took this step | प्रेयसीच्या जाचाला कंटाळून प्रियकराने उचलले 'हे' पाऊल, पोलिसही झाले हैराण

प्रेयसीच्या जाचाला कंटाळून प्रियकराने उचलले 'हे' पाऊल, पोलिसही झाले हैराण

Next

बीजिंग:चीनच्या शांघायमधून एक चकीत करणारी बातमी समोर आली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या जासापासून वाचण्यासाठी अशी युक्ती लढवली की, पोलिसही हैराण झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेयसीच्या जाचाला कंटाळून एका व्यक्तीने चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला आणि तुरुंगात जाण्याची मागणी केली.

चीनला बनवायचंय 1 किलोमीटर लांब अंतराळयान, रिसर्च सुरू

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चीनच्या शांघायमध्ये एका तरुणाला 2,000 युआन रुपयांचे ब्लूटूथ स्पीकर चोरताना पकडले. पोलिसांनी त्याला पोलिस स्टेशनमध्ये नेऊन चौकशी केली असता, त्याने त्याच्यावरची आपबीती सांगितली. त्याने सांगितल्यानुसार, त्याची प्रेयसी खुप मागण्या करायची. तसेच, अनेक दिवसांपासून ती लग्नाचा तगादा लावत होती. तिच्या या मागण्यांना कंटाळलेल्या तरुणाला काही दिवस शांत राहायचे होते. त्यामुळे त्याने चोरी करुन तरुंगात जाण्याचा मार्ग निवडला.

अफगाणिस्तान सोडण्यासाठी मुलींचे बळजबरीने लग्न, रिपोर्टमध्ये खुलासा

CCTV असताना चोरी केली
या तरुणीने तुरुंगात जाण्याचे पक्के ठरवले होते. ज्या दुकानातून त्याने ब्लुटूथ स्पीकर चोरले, त्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते. चोरीच्या वेळेस तो तरुण मुद्दामुण त्या कॅमेऱ्यात पाहाताना दिसला. त्याचा चेहरा यात दिसल्यामुळेच पोलिसांना त्याला पकडण्यात अडचण आली नाही. दरम्यान, पोलिसांनीही त्याची इच्छा पूर्ण केली आणि त्याला तुरुंगात टाकले. आता त्याच्यावर चोरीचा खटला चालवला जाणार आहे.

Web Title: china news; Tired of his girlfriend's harassment, boyfriend took this step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन