China Offer: विद्यार्थ्यांनो, स्पर्म डोनेट करा; चीन भलीमोठी रक्कम मोजतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 11:20 PM2023-02-11T23:20:27+5:302023-02-11T23:20:54+5:30

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर चीनमध्ये शुक्राणू दान करण्याचे आवाहन हा ट्रेंडिंग विषय बनला आहे.

China Offer: Students, Donate Sperm; China is paying a huge amount after population crunch | China Offer: विद्यार्थ्यांनो, स्पर्म डोनेट करा; चीन भलीमोठी रक्कम मोजतोय

China Offer: विद्यार्थ्यांनो, स्पर्म डोनेट करा; चीन भलीमोठी रक्कम मोजतोय

googlenewsNext

चीनमध्ये विद्यापीठांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्म डोनेट करून मोठी कमाई करण्याचा मार्ग सापडला आहे. बिजिंग, शांघायसह चीनभरातील स्मर्म डोनेशन क्लिनिकनी विद्यार्थ्यांना शुक्राणू दान करण्याची विनंती केली आहे. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर चीनमध्ये शुक्राणू दान करण्याचे आवाहन हा ट्रेंडिंग विषय बनला आहे. या आठवड्यात या समस्येवरील थ्रेड 240 दशलक्ष वेळा पाहिले गेले आहेत, असा दावा स्थानिक मिडीयाने केला आहे. 

दक्षिण-पश्चिम चीनमधील युनान ह्युमन स्पर्म बँकेने पहिल्यांदा या विद्यार्थ्यांना स्पर्म डोनेट करण्याचे आवाहन केले होते. यानंतर यामध्ये अन्य सेंटरनी उडी घेतली. शुक्राणू दानाचे फायदे, नोंदणीच्या अटी, अनुदान आणि शुक्राणू दान प्रक्रियेची सुरुवात याविषयी माहिती देण्यात आली. यामुळे चीनमधील इतर प्रांत आणि शहरांमधील शुक्राणू बँकांनाही असेच आवाहन करावे लागले आहे. 
“वायव्य चीनमधील शानक्सी (प्रांत) सह इतर ठिकाणी शुक्राणू बँकांनी असेच आवाहन केले आहे. चीनची लोकसंख्या सहा दशकांनंतर प्रथमच 2022 मध्ये घटली होती, यामुळे यावर गरमागरम चर्चा होत आहे'' असे सरकारी वृत्तपत्राने म्हटले आहे. 

डोनरना वैद्यकीय तपासणी करावी लागेल आणि जे पात्र आहेत आणि 8-12 वेळा दान करतील त्यांना 4,500 युआन ($664) चे अनुदान दिले जाणार आहे. शानक्सी स्पर्म बँकेसाठी अनुदान ५,००० युआन ($७३४) असणार आहे. अत्यंत कडक अटीही ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये टक्कल न पडणे, धूम्रपान करणे किंवा मद्यपान करणे आणि गंभीर मायोपिया आणि उच्च रक्तदाब यांचा समावेश आहे. 
 

Web Title: China Offer: Students, Donate Sperm; China is paying a huge amount after population crunch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन