3 तासांचं अंतर 30 मिनिटांत; जगातील सर्वाधिक लांबीच्या सागरी पुलाचं लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 10:40 AM2018-10-23T10:40:54+5:302018-10-23T10:43:51+5:30

पुलाच्या उभारणीसाठी तब्बल 20 अब्ज डॉलर्सचा खर्च

China opens worlds longest sea bridge linking Hong Kong Macau Zhuhai | 3 तासांचं अंतर 30 मिनिटांत; जगातील सर्वाधिक लांबीच्या सागरी पुलाचं लोकार्पण

3 तासांचं अंतर 30 मिनिटांत; जगातील सर्वाधिक लांबीच्या सागरी पुलाचं लोकार्पण

Next

नवी दिल्ली: चीनच्या जुहाई शहराला हाँगकाँग आणि मकाऊला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण करण्यात आलं आहे. समुद्रात उभारण्यात आलेला हा जगातील सर्वाधिक लांबीचा पूल आहे. 20 अब्ज डॉलर (दीड लाख कोटी रुपये) खर्चून उभारण्यात आलेला हा पूल 55 किलोमीटर लांबीचा आहे. या पुलाचं काम 2009 मध्ये सुरू झालं होतं. पर्ल रिव्हर एस्चुरीच्या लिंगदिंग्यांग प्रांतात या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. 



जगातील सर्वाधिक लांबीच्या पुलाच्या उभारणीसाठी तब्बल चार लाख टन स्टीलचा वापर करण्यात आला. इतक्या स्टीलचा वापर करुन 60 आयफेल टॉवर उभारले जाऊ शकतात. या पुलाच्या खाली असलेल्या समुद्रात 6.7 किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात आला आहे. हा बोगदा दोन कृत्रिम बेटांना जोडतो. यामुळे हाँगकाँग ते जुहाई दरम्यानचा प्रवास अवघ्या 30 मिनिटांवर येणार आहे. याआधी या प्रवासासाठी 3 तासांचा अवधी लागायचा. 



समुद्रात उभारण्यात आलेला हा पूल हाँगकाँग आणि मकाऊसह दक्षिण चीनमधील 11 शहरांना जोडतो. या भागात 6.8 कोटी लोकांचं वास्तव्य आहे. हा पूल 120 वर्षे वापरला जाऊ शकतो. या पुलामुळे व्यापार वाढणार आहे. त्यामुळे त्याचा मोठा फायदा चीनच्या अर्थव्यवस्थेला होईल. या पुलाचा वापर करण्यासाठी हाँगकाँगमधील कार चालकांना विशेष परवाना आवश्यक असेल. या पुलावर पादचाऱ्यांना परवानगी नाही. या पुलाचं काम सुरू असताना घडलेल्या दुर्घटनेत सात मजुरांचा मृत्यू झाला होता, तर 129 जण जखमी झाले होते. 
 

Web Title: China opens worlds longest sea bridge linking Hong Kong Macau Zhuhai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन