कोरोना लॉकडाऊन असताना चीनमध्ये वाजवताहेत 'जिम्मी जिम्मी आजा आजा' गाणं; 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 05:16 PM2022-11-01T17:16:13+5:302022-11-01T17:21:04+5:30

चीनमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असताना सरकार झीरो कोविड पॉलिसीअंतर्गंत बीजिंगमधील काही परिसरात सातत्याने लॉकडाऊनची घोषणा करण्यात येत आहे.

china people protest using bappi lahiri jimmy jimmy song against zero covid policy lockdown | कोरोना लॉकडाऊन असताना चीनमध्ये वाजवताहेत 'जिम्मी जिम्मी आजा आजा' गाणं; 'हे' आहे कारण

फोटो - NBT

googlenewsNext

जगभरात कोरोनाने थैमान घातले होते. मात्र आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्याचं पाहायला मिळत आहे. असं असताना चीनमध्ये मात्र परिस्थिती दिवसागणिक अधिक गंभीर होत चालली आहे. चीनमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असताना सरकार झीरो कोविड पॉलिसीअंतर्गंत बीजिंगमधील काही परिसरात सातत्याने लॉकडाऊनची घोषणा करण्यात येत आहे. सरकारच्या या झिरो कोविड पॉलिसीमुळं हैराण झाले आहेत. नागरिक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, या आंदोलनाचे भारताशीदेखील कनेक्शन आहे. आंदोलनकर्ते बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांच्या गाण्याचा वापर करत आहेत.

चीनने लागू केलेल्या लॉकडाऊनविरोधात नागरिक मोठ्यासंख्येने रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी आंदोलनात 1982 साली आलेल्या डिस्को डान्सर या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं 'जिम्मी जिम्मी आजा आजा' या गाण्याचा वापर केला आहे. हे गाणं बप्पी लहिरी यांनी गायलं आहे. चीनमधील सोशल मीडिया साइट दोयूयिनवर (टिकटॉकचं चिनी नाव) हे गाणं मंडारीन भाषेत गायलं जात आहे. 'जिमी जिमी' या गाण्याचा जर मराठीत अनुवाद केल्यास मला भात द्या, मला भात द्या, असा होतो. या व्हिडिओत लोकं रिकामी ताटं घेऊन आंदोलन करत आहेत. म्हणजेच, लॉकडाऊनच्या काळात अन्नाचा तुटवडा होत असल्याची तक्रार यावेळी आंदोलकांनी केली आहे.

सोशल मीडियावर हे व्हि़डीओ आता जोरदार व्हायरल होत आहेत. सामान्यतः सरकारवर टीका करणारे व्हिडीओ तात्काळ हटवण्यात येतात. मात्र, अजूनही हा व्हिडिओ सोशल मीडियावर आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय चित्रपट लोकप्रिय आहेत. 1950-60 च्या दशकातील राजकपूर यांचे चित्रपटांपासून 3 इडियट, सीक्रेट सुपरस्टार, हिंदी मिडीयम, दंगल आणि अंधाधुंध या चित्रपटांना चीनी प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला होता.

वुहानमध्ये कोरोनाचा कहर; 3 वर्षांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन, 8 लाख लोक घरात कैद

चीनच्या नागरिकांनी बॉलिवूडच्या गाण्यातून आंदोलन करण्याचा जो मार्ग शोधून काढला आहे तो भन्नाट आहे, या माध्यमातून सरकारची झिरो कोविड पॉलिसीमुळं निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत सरकारला धारेवर धरत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. लाखो लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. याच दरम्यान आता चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. जिथे कोरोनाचा उगम झाला त्या वुहान शहरापासून उत्तर पश्चिमेकडील अनेक शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनामुळे परिसरातील इमारती सील करण्यात आल्या आहेत
 

Web Title: china people protest using bappi lahiri jimmy jimmy song against zero covid policy lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.