China Plane Crash: अवघ्या काही क्षणात विमान खाली आले अन्...; दुर्घटनेपूर्वीचा अखेरचा Video समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 06:42 PM2022-03-21T18:42:20+5:302022-03-21T18:42:53+5:30
चायना एविएशन रिव्यूकडून एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात विमानाच्या दुर्घटनेपूर्वीचं सांगण्यात आले आहे. यात दावा केला आहे
चीनच्या १३३ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान गुआंगशी छुआंग इथं क्रॅश झालं. या दुर्घटनेचा भीषण व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात धूर आणि आगीच्या ज्वाला नजर येत आहेत. चीनच्या सिव्हिल एविएशन एडमिनिस्ट्रेशननं बोईंग ७३७ एअरक्राफ्ट कुनमिंगहून गुआनझो जात होतं. तेव्हा वुझो शहराजवळ या विमानाशी संपर्क तुटला. या विमानात एकूण १२४ प्रवासी आणि विमान क्रू मेंबर ९ असे १३३ जण होते.
चायना एविएशन रिव्यूकडून एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात विमानाच्या दुर्घटनेपूर्वीचं सांगण्यात आले आहे. यात दावा केला आहे की, विमान वेगाने खाली येत पर्वताला आदळल्याचं दिसून येते. रिपोर्टनुसार, ही घटना स्थानिक माइनिंग कंपनीच्या सिक्युरिटी कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. विमानाबाबत त्यावेळी चिंता वाढली जेव्हा स्थानिक मीडियाने सांगितले की, चायना ईस्टर्नची फ्लाइट एमयू ५७३५ कुनमिंगहून १ वाजता टेकऑफ घेतले परंतु ती त्याच्या गतव्य गुआनझो येथे पोहचलं नाही.
फ्लाइट ट्रॅकर २४ नुसार, एमयू ५७३५ विमानाचा २ वाजून २२ मिनिटांनंतर डेटा मिळाला नाही. त्यानुसार, माहिती थांबण्यापूर्वी २.१५ मिनिटांवर हे विमान २९ हजार १०० फूट उंचावर होते ते खाली ९ हजार ७५ फूटांवर आले. परंतु अवघ्या २० सेकंदात हे विमान ३ हजार २२५ फूटांवर पोहचले. क्रूजिंगहून लँडिंगपर्यंत साधारणपणे हे अंतर पार करण्यास ३० मिनिटं लागतात. एका गावकऱ्याने न्यूज एजेंसी एएफपीला म्हटलं की, हे विमान कोसळल्यामुळे आसपासच्या वन परिसर आगीत उद्ध्वस्त झाला. या भीषण दुर्घटनेतही एकही माणूस वाचण्याची शक्यता नाही असं शोध पथकाने सांगितले आहे.
Final seconds of #MU5735pic.twitter.com/gCoMX1iMDL
— ChinaAviationReview (@ChinaAvReview) March 21, 2022
४ वर्षांत बाईंग विमानाचे ३ मोठे अपघात
या धक्कादायक विमान अपघातामुळे १० मार्च २०१९ चा दिवसही आठवला, जेव्हा इथिओपियामध्ये बोईंग ७३७ विमान कोसळले. विमानात १५७ लोक होते आणि सर्वांचा मृत्यू झाला होता. एडिस अबाबाजवळ हा अपघात झाला होता. हे विमान इथियोपियन एअरलाइन्सचे होते. हे विमान केनियाची राजधानी नैरोबीला जात होते. विमानात एकूण १४९ प्रवासी आणि ८ क्रू मेंबर्स होते. बोले इंटरनेशनल एयरपोर्टवरून विमानाने उड्डाण केले आणि कंट्रोल रूमशी त्याचा संपर्क तुटला.
या घटनेपूर्वी ऑक्टोबर २०१८ मध्ये इंडोनेशियामध्येही एक अपघात झाला होता. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे २९ ऑक्टोबर २०१८ रोजी एक मोठा विमान अपघात झाला होता. जकार्ताहून टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या १३ मिनिटांत लायन एअरचे विमान कोसळले. या विमानात कर्मचाऱ्यांसह एकूण १८९ जण होते. या १८९ लोकांमध्ये १७८ लोकांव्यतिरिक्त ३ मुले, २ पायलट आणि ५ केबिन क्रू होते. या अपघातात सर्व १८९ जणांचा मृत्यू झाला. आजच्याच दिवशी ९ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१३ मध्येही येथे बोइंग-७३७ विमान कोसळले होते. या अपघातात सुमारे १०८ जणांचा मृत्यू झाला होता.