नव्या आजारामुळे चीनमध्ये हाहाकार, हजारो मुलं आजारी; कोरोनासारखी परिस्थिती, तज्ज्ञ म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 11:11 AM2023-12-03T11:11:06+5:302023-12-03T11:12:10+5:30

दररोज सात हजारांहून अधिक आजारी लोक रुग्णालयात येत असल्याची माहिती समोर आली आहे

china pneumonia respiratory illness new pathogen | नव्या आजारामुळे चीनमध्ये हाहाकार, हजारो मुलं आजारी; कोरोनासारखी परिस्थिती, तज्ज्ञ म्हणतात...

नव्या आजारामुळे चीनमध्ये हाहाकार, हजारो मुलं आजारी; कोरोनासारखी परिस्थिती, तज्ज्ञ म्हणतात...

चीनमध्ये मुलांमध्ये न्यूमोनियासारखे आजार पसरत आहेत. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. दररोज सात हजारांहून अधिक आजारी लोक रुग्णालयात येत असल्याची माहिती समोर आली आहे. या आजाराबाबत जगाचं टेन्शन वाढलेलं असताना दुसरीकडे चीनने मात्र घाबरण्यासारखं काहीच नसल्याचं म्हटलं आहे.

चीनचे अधिकारी म्हणतात की, फ्लू सारख्या रोगाचे कारण कोणताही पॅथोजन किंवा नवीन संसर्ग नाही. चीनमध्ये पसरत असलेल्या रोगामध्ये असामान्य असं काहीही नाही. कोरोना व्हायरसचे कडक निर्बंध उठवल्यामुळे मुलांना फ्लू होत आहे.

गेल्या आठवड्यात, जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) उत्तर देताना, चीनने म्हटलं होतं की मुलांमध्ये न्यूमोनियासारख्या प्रकरणांमध्ये वाढ होणं 'असामान्य' किंवा 'नवीन आजार' नाही. कोविड निर्बंध हटवल्यामुळे फ्लूसारखे आजार वाढत आहेत.

चीनमध्ये न्यूमोनियासारख्या आजारांच्या वाढत्या प्रकरणांमुळे टेन्शन वाढतं कारण कोरोनाची सुरुवात चार वर्षांपूर्वी डिसेंबर 2019 मध्ये झाली होती. यानंतरच कोरोना जगभर पसरला आणि एक महामारी बनली.

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे अधिकारी मी फेंग यांनी सांगितलं की, आजारी लोकांची वाढती संख्या पाहता चीनमध्ये पीडियाट्रिक क्लिनिक्स उघडले जात आहेत. चिनी अधिकाऱ्यांना शक्य तितक्या लहान मुलांना आणि वृद्धांना फ्लूची लस देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकांना मास्क घालण्याचे आणि वारंवार हात धुण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

चीनमध्ये हा आजार वाढत असल्याने काळजी करण्याची गरज नसल्याचं चिनी डॉक्टर आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तज्ज्ञ म्हणतात की, कोरोना निर्बंध उठवल्यामुळे हा प्रकार केवळ चीनमध्येच नाही तर अनेक देशांमध्ये पसरत आहे.
 

Web Title: china pneumonia respiratory illness new pathogen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन