चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणतात... जीव वाचवा; जगात कोरोनाची ६६ कोटी २४ लाख प्रकरणे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 07:35 AM2022-12-29T07:35:05+5:302022-12-29T07:35:41+5:30
कोरोनासंदर्भात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे वक्तव्य पुढे आले आहे. नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन त्यांनी केले.
बीजिंग/न्यूयॉर्क : कोरोनासंदर्भात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे वक्तव्य पुढे आले आहे. नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन त्यांनी केले.
चीनमधील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल नेमकेपणाने माहिती उपलब्ध नसल्याने तेथील परिस्थितीचा अंदाज येणे कठीण होत असताना आता अमेरिकेने चीन कोरोनाची माहिती दडवतोय, असा थेट आरोप केला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही चीन निर्बंध सैल करीत आहे, तर अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध वाढवले आहेत. येथे बहुतेक रुग्णालयांमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. जगात कोरोनाची आतापर्यंत ६६ कोटी २४ लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"