Video : आपल्याच माणसांच्या पैशांवर China चा डल्ला?; बँकेतील रक्कम वाचवण्यासाठी रणगाड्यांचे संरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 10:46 AM2022-07-21T10:46:21+5:302022-07-21T10:46:31+5:30
तब्बल ४० बिलियन युआन म्हणजेच ६ बिलियन डॉलर्स चीनच्या बँक सिस्टममधून गायब झाल्याचा दावा केला जात आहे.
चीनच्या रस्त्यांवर रणगाड्यांची रांग पाहून अनेकांना धक्का बसला आहे. स्थानिक माध्यमांचा हवाला देत Reddit युझर्सनं ते फुटेज शेन्डॉंग क्षेत्रातील रिझाओ येथील असल्याचं म्हटलं आहे. येथे एका बँकेची स्थानिक शाखा वाचवण्यासाठी रस्त्यांवर रणगाडे उतरवण्यात आले होते. अनेक रणगाडे रांगेत उभे असून ते लोकांना त्या ब्रान्च पर्यंत जाण्यापासून रोखत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये स्थानिक लोकांमध्ये संताप असल्याचंही दिसून येत आहे. दरम्यान, Reddit युझरनं या घटनेची तुलना १९८९ मधील तियानमेन घटनेशी केली आहे. त्यावेळी शेकडो रणगाड्यांचा वापर लोकशाहीच्या समर्थकांचा विरोध हाणून पाडण्यासाठी केला जात होता. हा मुद्दा पहिल्यांदा एप्रिल महिन्यात समोर आला होता. साऊथ चायना मॉर्निग पोस्टनं एका लेखात हेनान आणि अन्हुई क्षेत्रातील लोकांना सिस्टम अपग्रेडमुळे बँक खात्यांचा अॅक्सेस दिला जात नसल्याचं म्हटलं होतं.
तेव्हापासून युझोऊ शिनमिनशेंग (Yuzhou Xinminsheng) व्हिलेज बँक, शँगकाऊ हुईमिन काउंटी बँक (Shangcai Huimin County Bank), झेचेंग हुआनगुआई कम्युनिटी बँक ( Zhecheng Huanghuai Community Bank) आणि हेनान प्रांतातील यू ओरिएंटल कंट्री बँक ऑफ कायफेंग (Oriental Country Bank of Kaifeng), नजीकच्याच अनहुई प्रांतातील गुझेन शिंनहुआइहे व्हिलेज बँक (Guzhen Xinhuaihe Village Bank) प्रभावित झाल्या आहेत.
🚨🚨🚨🚨Breaking news🚨🚨🚨🚨
— Wall Street Silver (@WallStreetSilv) July 20, 2022
Tanks are being put on the streets in China to protect the banks.
This is because the Henan branch of the Bank of China declaring that people's savings in their branch are now 'investment products' and can't be withdrawn.
🔊sound pic.twitter.com/cwTPjGz84K
दरम्यान, एका लेखात या घटनेचा उल्लेख इतिहासाची पुनरावृत्ती होते अशा पद्धतीनं केला आहे. जर रणगाड्यांच्या ऑपरेटर्सनाही आपले पैसे काढता आले नाही तर?, असा प्रश्न एका युझरनं केला आहे. तब्बल ४० बिलियन युआन म्हणजेच ६ बिलियन डॉलर्स चीनच्या बँक सिस्टममधून गायब झाल्याचा दावा केला जात आहे. तसंच लोक आपले पैसे काढण्याची मागणी करत आदोलन करत आहेत. शाखेतील पैसे हे आता काढता येणार नसून ते गुतवणूकीसाठी असल्याचं बँकेनं सांगितल्याचा दावा वॉल स्ट्रिट सिल्व्हरनं केला आहे.