चीनने ‘पेंटॅगॉन’चा अहवाल फेटाळला
By admin | Published: May 16, 2016 04:02 AM2016-05-16T04:02:51+5:302016-05-16T04:02:51+5:30
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने चीनच्या लष्करी क्षमतेबाबत तयार केलेल्या अहवालावर चीनने हल्लाबोल केला
बीजिंग : अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने चीनच्या लष्करी क्षमतेबाबत तयार केलेल्या अहवालावर चीनने हल्लाबोल केला. या अहवालाने परस्पर विश्वासाला ‘मोठा तडा’ दिल्याचे म्हटले आहे. पेंटॅगॉनने आपल्या संरक्षणविषयक धोरणाला मुद्दाम विपर्यास्त स्वरूपात मांडल्याचेही चीनचे म्हणणे आहे.
पेंटॅगॉनने शुक्रवारी आपला जागतिक संरक्षणविषयक अहवाल जारी केला. त्यात चीनच्या वाढत्या लष्करी शक्तीचा आणि त्या देशाच्या लष्करी हालचालींचा मागोवा घेण्यात आला आहे. या अहवालावर चीनने ‘तीव्र’ असंतोष व्यक्त केला. अहवालात लष्करी विकासाला चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचे म्हटले आहे. दक्षिण चीन सागर, भारतीय सीमेवर आणि पाकिस्तानात चीन आपली लष्करी उपस्थिती वाढवीत असल्याचे आणि त्यातून तणाव वाढत असल्याचे म्हटले आहे. विशेषत: दक्षिण चीन सागरात लष्करी उपस्थिती वाढविण्याबाबत विश्लेषण केले आहे.