मोठी बातमी : आता चीनकडून Digital Strike, अमेरिकेसह अनेक मोठ्या देशांच्या 105 अ‍ॅपवर घातली बंदी

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 8, 2020 12:49 PM2020-12-08T12:49:27+5:302020-12-08T12:53:34+5:30

याच वर्षी भारताने चीनवर तीन वेळा डिजिटल स्ट्राईक केले.  तिसऱ्या डिजिटल स्ट्राइकमध्ये केंद्रातील मोदी सरकारने चीनच्या 43 मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सवर पूर्णपणे बंदी घातली.

China removed 105 apps including of us travel firm trip advisor from app stores in the country | मोठी बातमी : आता चीनकडून Digital Strike, अमेरिकेसह अनेक मोठ्या देशांच्या 105 अ‍ॅपवर घातली बंदी

मोठी बातमी : आता चीनकडून Digital Strike, अमेरिकेसह अनेक मोठ्या देशांच्या 105 अ‍ॅपवर घातली बंदी

googlenewsNext
ठळक मुद्देचीन सरकारने 105 अ‍ॅपवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. अमेरिकेसह जगातील अनेक मोठ्या देशांतील प्रसिद्ध अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. या अ‍ॅप्सवर अश्लील साहित्य, वेश्यावृत्ती, जुगार आणि हिंसक गोष्टी पसरविण्याचा आरोप आहे.

बिजिंग -भारतानंतर आता चीननेही डिजिटल स्ट्राइक केले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, चीन सरकारने 105 अ‍ॅपवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. यात अमेरिकेसह जगातील अनेक मोठ्या देशांतील प्रसिद्ध अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नाही, तर हे अ‍ॅप तत्काळ अ‍ॅप स्टोअरवरूनही हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याच वर्षी भारताने चीनवर तीन वेळा डिजिटल स्ट्राईक केले.  तिसऱ्या डिजिटल स्ट्राइकमध्ये केंद्रातील मोदी सरकारने चीनच्या 43 मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सवर पूर्णपणे बंदी घातली. भारताने आतापर्यंत चीनच्या जवळपास 220 मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यात टिकटॉक, पबजी आणि यूसी ब्राउझर सारख्या प्रसिद्ध अ‍ॅप्सचा समावेश आहे.

...म्हणून चीनने या अ‍ॅप्सवर घातली बंदी -
चीनने अमेरिकेची ट्रॅव्हल कंपनी ट्रिपअ‍ॅडव्हायझरसह 105 अ‍ॅप्स देशाच्या अ‍ॅप स्टोर्सवरून हटवले आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एका अभियानांतर्गत ही बंदी घालण्यात आली आहे. या अ‍ॅप्सवर अश्लील साहित्य, वेश्यावृत्ती, जुगार आणि हिंसक गोष्टी पसरविण्याचा आरोप आहे. चीनच्या सायबरस्पेस प्रशासनाने मंगळवारी आपल्या वेबसाईटवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की या अ‍ॅप्सनी कसल्याही प्रकारची माहिती न देता एकापेक्षा अधिक वेळा सायबर कायद्याचे उलंघन केले आहे.

भारताने अनेक अ‍ॅप्सवर घातलीय बंदी -
भारत सरकारने जून 2020मध्ये टिकटॉकसह 59 मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सवर बंदी घातली होती. याशिवाय 2 सप्टेंबरला 110 इतर अ‍ॅप्लिकेशन्सवर बंदी घातली होती. यातील अधिकांश चिनी अ‍ॅप्स होते. यांपैकी अनेक अ‍ॅप्सवर भारतीय नागरिकांची अधिकांश माहिती जमवण्याचा (विशेषतः सीमावर्ती भागांतील नागरिकांची प्रोफायलिंग करून माहिती जमवणे) आरोप ठेवण्यात आला होता.

Read in English

Web Title: China removed 105 apps including of us travel firm trip advisor from app stores in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.