China Road Accident: चीनमध्ये धुक्यामुळे गाड्या आपटल्या; 17 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 04:28 PM2023-01-08T16:28:02+5:302023-01-08T16:29:00+5:30

अपघात ग्रस्त वाहनांची संख्या मोजली जात आहे, अजून प्रचंड धुके असल्याने समोरील काही दिसत नाहीय. जेवढे जखमी सापडत आहेत तेवढ्यांना हॉस्पिटलमध्ये हलविले जात आहे.

China Road Accident: lots of Cars hit due to fog in China; 17 people died | China Road Accident: चीनमध्ये धुक्यामुळे गाड्या आपटल्या; 17 जणांचा मृत्यू

China Road Accident: चीनमध्ये धुक्यामुळे गाड्या आपटल्या; 17 जणांचा मृत्यू

googlenewsNext

दक्षिणी चीनमध्ये रविवारी सकाळी भीषण अपघात झाले आहेत. धुक्यामुळे समोरील काही न दिसल्याने अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. यामुळे १७ जणांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत. 

चीनमध्ये नववर्षाचा उत्सव सुरु आहे. यामुळे लोक सुट्टी काढून बाहेर फिरायला जात असतात. यातच धुके असल्याने पर्यटकांची वाहने एकमेकांवर आदळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक वाहतूक व्यवस्थापन ब्रिगेडने दिलेल्या माहितीनुसार जिआंगशी प्रांतातील नानचांग शहराच्या बाहेरील भागात हा अपघात झाला. 

अपघात ग्रस्त वाहनांची संख्या मोजली जात आहे, अजून प्रचंड धुके असल्याने समोरील काही दिसत नाहीय. जेवढे जखमी सापडत आहेत तेवढ्यांना हॉस्पिटलमध्ये हलविले जात आहे. मृतदेहांना उत्तरीय तपासणीसाठी पाठविले जात आहे, असे एजन्सीने सांगितले. 

सुट्टीच्या काळात ड्रायव्हर आणि प्रवाशांची संख्या वाढते. चंद्र वर्ष हे चीनमधील कुटुंबे ही एकत्र येऊन साजरे करतात. यामुळे लाखो प्रवासी त्यांच्या गावी परततात. कोविड-19 चे बहुतेक निर्बंध हटवल्यामुळे या वर्षी 22 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आठवडाभराच्या सणासुदीच्या हंगामात मोठ्या संख्येने लोक प्रवास करतील अशी अपेक्षा आहे. त्यातच चीनचा बहुतांश भाग कोरोनाग्रस्त आहे. 

डिसेंबरमध्ये चीनमधील झेंगझोऊ येथेही अशी मोठी दुर्घटना घडली होती. त्यावेळी एका पुलावर सुमारे 200 वाहने एकमेकांवर आदळली होती. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. तो अपघातही दाट धुक्यामुळे झाला होता. 
 

Web Title: China Road Accident: lots of Cars hit due to fog in China; 17 people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.