भारतीय जवानांशी टक्कर, एक पाऊल मागे हटण्यास चीन 'मजबूर'; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 05:30 PM2021-01-25T17:30:50+5:302021-01-25T17:32:16+5:30
तत्पूर्वी, भारतीय लष्कराने सोमवारी सांगितले होते, की सिक्किमच्या उत्तरेला असलेल्या नाकूला भागात 20 जानेवारीला भारत आणि चिनी सैन्यांत ‘सामान्य बाचाबाची’ झाली होती. निर्धारित प्रोटोकॉलनुसार, स्थानिक कमांडरांकडून हा वाद मिटवण्यात आला.
गेल्या आठवड्यात सिक्किमच्या नाकू ला भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय लष्करासोबत झालेल्या झटापटीनंतर चीनला मागे हटावे लागले आहे. तसेच सीमा रेषेवर शांतता कायम ठेवण्यास आम्ही वचनबद्ध आहोत, असेही चीनने म्हटले आहे. याशिवाय, भारताने कुठल्याही प्रकारची एकतर्फी कारवाई करू नये, असेही चीनने म्हटले आहे.
चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, आमचे सैनिक भारत-चीन सीमा भागात शांतता कायम ठेवण्यास वचनबद्ध आहेत. तसेच, चीन भारताला आवाहन करतो, की सीमेवरील परिस्थिती बिघडेल अशी एकतर्फी कारवाई होणार नाही याकडे भारताने लक्ष द्यावे. सीमावर्ती भागात शांतता रहावी यासाठी प्रयत्न करावेत."
तत्पूर्वी, भारतीय लष्कराने सोमवारी सांगितले होते, की सिक्किमच्या उत्तरेला असलेल्या नाकूला भागात 20 जानेवारीला भारत आणि चिनी सैन्यांत ‘सामान्य बाचाबाची’ झाली होती. निर्धारित प्रोटोकॉलनुसार, स्थानिक कमांडरांकडून हा वाद मिटवण्यात आला.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, यासंदर्भात भारतीय लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘‘स्पष्ट करण्यात येते, की उत्तर सिक्किमच्या नाकू ला येथे 20 जानेवारीला ‘सामान्य बाचाबाची’ झाली होती. हा वाद निर्धारित प्रोटोकॉलनुसार स्थानिक कमांडर्सनी सोडवला होता. माध्यमांना आवाहन करत आहोत, की ही घटना मोठी करून दाखवू नये. कारण ते तथ्यात्मक दृष्ट्या चुकीचे आहे.’’ घटनेची माहिती असणाऱ्यांनी सांगितल्यानुसार चिनी सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवानांनी त्यांना अडवले. त्यांचे म्हणणे आहे, की दोन्ही देशांच्या सैनिकांत भांडणही झाले होते.
गलवान घाटीमध्ये पहिला हल्ला -
15 जूनला चीनच्या सैनिकांनी गलवान घाटीमध्ये पहिला हल्ला केला होता. खिळे असलेले लोखंडी रॉड, अणुकुचीदार जाळी आदींनी भारतीय जवानांवर हल्ला केला होता. भारतीय जवानांनी लगेचच सावध होत चीनच्या सैनिकांना चोख प्रत्यूत्तर दिले होते. यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. तर ४० हून अधिक चिनी सैनिक मारले गेले होते. देशातील असंतोष रोखण्यासाठी चीनने अद्याप हे मान्य केलेले नाही.