China Coronavirus: चीन सरकार २०,००० कोरोनाग्रस्तांना मारणार?; जाणून घ्या बातमीमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 08:32 AM2020-02-07T08:32:09+5:302020-02-07T10:28:43+5:30

रुग्णालयात असणाऱ्या कोरोना व्हायरस ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

China seeks court approval to kill 20 thousand patients suffering from corona virus? | China Coronavirus: चीन सरकार २०,००० कोरोनाग्रस्तांना मारणार?; जाणून घ्या बातमीमागचं सत्य

China Coronavirus: चीन सरकार २०,००० कोरोनाग्रस्तांना मारणार?; जाणून घ्या बातमीमागचं सत्य

Next

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने संपूर्ण चीनमध्ये दहशतीचं वातावरण पसरवलं असून आतापर्यंत या आजारामुळे ४०० हून अधिक जणांचा जीव घेतला आहे. प्रचंड वेगात पसरणाऱ्या या व्हायरसला नियंत्रणात आणण्यासाठी चीन सरकारने  २० हजार कोरोनाग्रस्तांना  ठार मारण्याची परवानगी सुप्रीस पीपल्स कोर्टात मागितल्याची बातमी सोशल मीडियात पसरली आहे. या बातमीची खातरजमा केली असता त्यामागचं सत्य समोर आलं.

या बातमीबाबत कोणत्याही एजेन्सीने दुजोरा दिला नाही. 5 फेब्रुवारी, 2020 रोजी, एबी-टीसी (उर्फ सिटी न्यूज) वेबसाइटने असा दावा केला होता की चीन प्रशासन कोरोना व्हायरसने पीडित असलेल्या २० हजार लोकांच्या सामुहिक हत्येसाठी कोर्टाकडे परवानगी मागण्याच्या तयारीत आहे. कोरोना व्हायरस इतर रुग्णांना होऊ नये या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचा दावा केला होता. त्यासाठी चीनच्या अधिकाऱ्यांनी सुप्रीम पीपल्स कोर्टातही धाव घेतली आहे. 

कोरोनामुळे तब्बल 24 हजार मृत्यू; चीनी कंपनीचा डेटा लीक

मात्र, चीनच्या सुप्रीम पीपल्स कोर्टाच्या वेबसाइटवर अशा कुठल्याची याचिकेचा उल्लेख नाही. या वेबसाईटने केलेल्या दाव्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पुरावा अथवा बातमीचा स्रोत दिला नाही. या वेबसाइटवर चुकीची माहिती पसरविण्याचा इतिहास आहे. त्याचं उदाहरण म्हणजे जुलै २०१० मध्ये या वेबसाईटवर न्यूयॉर्क जायंट्सचे प्रशिक्षक पॅट शुरुमर यांचे निधन झाले अशा आशयाचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं होतं. मात्र २०१० मध्ये त्यांचा मृत्यू झाला नव्हता. ते अजूनही जिवंत आहेत. अद्यापही त्यांचे लेखन सुरु आहे. जानेवारी 2020 मध्ये डेन्वर ब्रोंकोसच्या समन्वयक म्हणून नियुक्त केले गेले. त्यामुळे कोरोना व्हायरसबाबत केलेल्या दाव्यामध्ये सध्यातरी कोणतंही तथ्य आढळत नसल्याने ही बातमी सोशल मीडियातील अफवा असल्याचं सिद्ध होतं. 

चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे बळींची संख्या ४९० वर; ३,२१९ रुग्णांची प्रकृती चिंताजनक

चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग जगभर वेगाने पसरत आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 425 लोकांचा मृत्यू झाला आह. जगभरात कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काही अहवालांमध्ये असं म्हटलं जात आहे की कोरोना विषाणू सीफूड मार्केटमधून नव्हे तर चीनच्या प्रयोगशाळेतून पसरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

कोरोना व्हायरसमुळे Apple चं मोठं नुकसान; जाणून घ्या कसं

कोरोना विषाणूचे रुग्ण चीनसह ३१ देशांमध्ये; हाँगकाँग, फिलिपिन्समध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू

 'हे' मिश्रण प्यायल्याने होते कोरोना वायरसचे निदान; ब्रिटिश नागरिकाने केला अनोखा दावा

 

Web Title: China seeks court approval to kill 20 thousand patients suffering from corona virus?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.