Coronavirus : चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला; शांघायमध्ये लॉकडाऊनचा दुसरा दिवस, आणखी कडक निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 11:25 AM2022-03-29T11:25:18+5:302022-03-29T11:26:04+5:30

Coronavirus : शांघायमध्ये दररोज आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या 4,400 च्या वर गेली आहे.

china shanghai tightens covid-19 lockdown on second day of curbs  | Coronavirus : चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला; शांघायमध्ये लॉकडाऊनचा दुसरा दिवस, आणखी कडक निर्बंध

Coronavirus : चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला; शांघायमध्ये लॉकडाऊनचा दुसरा दिवस, आणखी कडक निर्बंध

googlenewsNext

शांघाय : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे आर्थिक केंद्र असलेल्या शांघायमध्ये (Shanghai) लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. शांघाय शहरात मंगळवारी लॉकडाऊनचा दुसरा दिवस आहे. याअंतर्गत निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. येथील लोकांना कोरोना चाचणी होईपर्यंत घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शांघायमध्ये दररोज आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या 4,400 च्या वर गेली आहे.

हुआंगपूच्या पूर्वेला राहणाऱ्या लोकांना लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी त्यांच्या घरात राहण्याची सूचना देण्यात आली होती, त्यापैकी बहुतेकांना फिरण्याची परवानगी होती. तेथील दोन लोकांनी रॉयटर्सला सांगितले की, त्यांना त्यांच्या शेजाऱ्यांकडून माहिती मिळाली आहे की त्यांना त्यांच्या घरातून बाहेर जाण्याची परवानगी नाही. चीनच्या आर्थिक शहराची लोकसंख्या 2 कोटी 60 लाख आहे. येथे मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी सुरू आहे. कोरोना चाचणी प्रभावी करण्यासाठी शहरातील काही भागांची विभागणी करण्यात आली आहे. एक भाग शहरातून वाहणाऱ्या हुआंगपू नदीजवळ आहे आणि दुसरा भाग पुडोंग आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराचे ऐतिहासिक केंद्र आहे. 

स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पुडोंग आणि त्याच्या आसपासच्या भागात पुढील शुक्रवारपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पुडोंग हे शहराचे आर्थिक व्यवहार क्षेत्र मानले जाते. हुआंगपू नदी शांघायच्या मध्यातून वाहते. शांघाय प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लॉकडाऊन क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना घरातच राहावे लागेल आणि आवश्यक वस्तू वितरित केल्या जातील. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक व्यवहार वगळता शहरातील सर्व कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

28 मार्च रोजी चीनमध्ये कोरोना संसर्गाची 4,381 लक्षणे नसलेली (asymptomatic) आणि 96 लक्षणे असलेली (symptomatic) प्रकरणे नोंदवली गेली. देशात शून्य कोरोना प्रकरणाच्या उद्देशाने, शांघायमध्ये व्यापक चाचणीची प्रक्रिया सुरू आहे आणि अत्यंत संसर्गजन्य ओमायक्रॉन व्हेरिएंट शक्य तितक्या लवकर नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नोव्‍हेंबर 2019 मध्‍ये चीनमधूनच कोरोना महामारीची सुरुवात झाली. त्यानंतर ही महामारी जगभर पसरली.

Web Title: china shanghai tightens covid-19 lockdown on second day of curbs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.