अफगाणिस्तानसाठी भारत महत्वाचा, चीनलाही अखेर ऐकावं लागलं; चर्चेसाठी पाठवला विशेष दूत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 04:00 PM2022-08-06T16:00:30+5:302022-08-06T16:01:03+5:30

अफगाणिस्तानसाठी चीनचे विशेष दूत यू शिआओंग या आठवड्यात भारत भेटीवर आले होते. यादरम्यान, त्यांनी युद्धग्रस्त देशात शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्याच्या पद्धतींवर एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याशी चर्चा केली.

china special envoy holds talks with india on afghanistan security situation humanitarian aid | अफगाणिस्तानसाठी भारत महत्वाचा, चीनलाही अखेर ऐकावं लागलं; चर्चेसाठी पाठवला विशेष दूत!

अफगाणिस्तानसाठी भारत महत्वाचा, चीनलाही अखेर ऐकावं लागलं; चर्चेसाठी पाठवला विशेष दूत!

Next

अफगाणिस्तानसाठीचीनचे विशेष दूत यू शिआओंग या आठवड्यात भारत भेटीवर आले होते. यादरम्यान, त्यांनी युद्धग्रस्त देशात शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्याच्या पद्धतींवर एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याशी चर्चा केली. चीनच्या राजदूतानं अफगाणिस्तानसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे 'पॉइंट पर्सन' जेपी सिंग यांच्याशी विस्तृत चर्चा केली. राजदूतानं ट्विटरवर आपली भेट चांगली झाल्याचं म्हटलं आहे. तसंच दोन्ही बाजूंनी संवाद वाढविण्यास आणि अफगाणिस्तानात शांतता, स्थिरतेसाठी सकारात्मक प्रयत्न करण्यास सहमती दर्शविली आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये गुरुवारी ही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, विशेष दूत शिओयोंग यांच्या भेटीबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या राजदूताच्या या भेटीतून अफगाणिस्तानातील भारताची महत्त्वाची भूमिका दिसून येते. अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थिती पाहता भारत अनेक सर्वोच्च शक्तींच्या संपर्कात आहे. भारताने जूनमध्ये अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील आपल्या दूतावासात पथक तैनात करून आपली राजनैतिक उपस्थिती पुन्हा मजबूत केली आहे.

अफगाणिस्तानावर गेल्या वर्षी तालिबानचा कब्जा
तालिबानने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानचा ताबा घेतला होता. तालिबानच्या हल्ल्यानंतर भारताने काबूल येथील दूतावासातून आपले सर्व अधिकारी काढून घेतले होते. दूतावास पुन्हा सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर, एका भारतीय पथकाने काबूलला भेट दिली आणि अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी आणि तालिबानच्या काही सदस्यांची भेट घेतली.

अफगाणिस्तानात 110 अफगाण-शीख अजूनही अडकले
तालिबान-नियंत्रित अफगाणिस्तानात अजूनही ११० शीख भारतात येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्यापैकी ६० जणांना त्यांचा ई-व्हिसा मिळणे बाकी आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) गुरुवारी हा दावा केला गेला आहे. भारतीय जागतिक मंच आणि केंद्र सरकारच्या निर्वासन योजनेचा भाग म्हणून २६ प्रौढ आणि दोन लहान मुलांसह एकूण २८ अफगाण-शीख बुधवारी काबूलहून दिल्लीत दाखल झाले. याबाबत शिखांची सर्वोच्च धार्मिक संस्था एसजीपीसीने सांगितले की, अफगाणिस्तानातून आलेल्या या शीखांच्या राहण्याची व्यवस्था केली गेली आहे. तसंच अजूनही ११० शीख बांधव अजूनही अडकून आहेत असंही एसजीपीसीनं सांगितलं आहे. 

Web Title: china special envoy holds talks with india on afghanistan security situation humanitarian aid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.