अमेरिकेसाठी धोक्याची घंटा! चीन तयार करतोय 'स्टील्थ बॉम्बर', अणुहल्ला करण्याची जबरदस्त क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 03:01 PM2021-05-26T15:01:03+5:302021-05-26T15:01:45+5:30

चीन सध्या एक दूरपर्यंत मारा करता येईल अशा स्टील्थ बॉम्बरच्या निर्मितीमध्ये व्यग्र आहे. चीन तयार करत असलेले स्टील्थ बॉम्बर अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरू शकतो.

china stealth bomber xian h 20 strategic bomber could be able to hit us guam base with a nuke | अमेरिकेसाठी धोक्याची घंटा! चीन तयार करतोय 'स्टील्थ बॉम्बर', अणुहल्ला करण्याची जबरदस्त क्षमता

अमेरिकेसाठी धोक्याची घंटा! चीन तयार करतोय 'स्टील्थ बॉम्बर', अणुहल्ला करण्याची जबरदस्त क्षमता

googlenewsNext

चीन सध्या एक दूरपर्यंत मारा करता येईल अशा स्टील्थ बॉम्बरच्या निर्मितीमध्ये व्यग्र आहे. चीन तयार करत असलेले स्टील्थ बॉम्बर अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरू शकतो. कारण याच्या माध्यमातून बिजिंग, गुआम येथून अमेरिकी ठिकाणांवर अणुहल्ला करण्याची क्षमता चीनकडे निर्माण होणार आहे. चीनी सैन्यातील एका विश्लेषकानं याबाबतचा खुलासा केला आहे. (china stealth bomber xian h 20 strategic bomber could be able to hit us guam base with a nuke)

अमेरिकेसाठी चीननं तयार केलेले बॉम्बर धोक्याची घंटा ठरू शकतो. झियान एच-२० स्ट्रॅटेजिक बॉम्बरची कॉम्युटर जनरेटेड छायचित्र जारी करण्यात आली आहेत. नव्या पिढीच्या या फायटर जेटची पहिली झलक प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून यावर काम सुरू आहे. चीनच्या या अत्याधुनिक फायटर बॉम्बर जेटमध्ये दोन अॅडजेस्टेबल टेल विंग्स, एक हवाई रडार आणि कॉकपिटच्या दोन्ही बाजूला एअर इनटेक देण्यात आले आहेत. याच डिझाईन अमेरिकेच्या USAF B-2 Spirit याच्यासारखंच आहे. 

स्टील्थ बॉम्बरमध्ये नेमकं काय?
‘नोरिन्को’ मासिकाच्या मुखपृष्ठावर चीनच्या नव्या स्टील्थ बॉम्बरचं छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 'आकाशातील युद्धाचा देव' अशा मथळ्यासह फोटो छापण्यात आला आहे. चीनी स्टील्थ बॉम्बर करड्या रंगाचं अत्याधुनिक युद्धजन्य परिस्थितीत वापरण्यात येणार फायटर जेट असून रडार-अॅबसॉर्बेंट प्रणानीलं सज्ज आहे. याशिवाय, याचं डिझाइन असं आहे की रडारच्या तावडीतही सापडत नाही. माध्यमांमधील माहितीनुसार, झियान एच-२० स्ट्रॅटिजिक बॉम्बर अणुबॉम्ब, हायपरसोनिक आणि क्रूज मिसाइल घेऊन जाण्याची क्षमता ठेवतो. २०० टनांपर्यंतचं वजन हे विमान सहजपणे पेलू शकतं. तर विमानाचा सर्वोत्तम वेग ९८० किलोमीटर प्रतितास इतका आहे. 
 

Web Title: china stealth bomber xian h 20 strategic bomber could be able to hit us guam base with a nuke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.