चीनचा विकृत चेहरा उघड; नदीचे पाणी रोखल्याने चार देश तडफडले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 03:12 PM2020-04-14T15:12:35+5:302020-04-14T15:23:21+5:30
चीनने दक्षिण पूर्व आशियाई देशांमधून वाहणाऱ्या मेकांग नदीच्या पाण्याच्या प्रवाह कमी केला आहे. यातून चीनचा अमानवी चेहरा समोर आला आहे.
बँकॉक : जगाला कोरोना व्हायरसच्या विळख्यात टाकलेल्या चीनमध्ये व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहेत. या देशाने आता जगभरात चाचणी किट्स, पीपीई किट्स पुरवायाला सुरुवात केली असून इटलीला तर त्यांनीच मदत म्हणून पाठविलेली किट्स वापरून विकली होती. आता या देशाने नदीचे पाणी रोखून चार देशांमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण केली आहे.
चीनने दक्षिण पूर्व आशियाई देशांमधून वाहणाऱ्या मेकांग नदीच्या पाण्याच्या प्रवाह कमी केला आहे. यातून चीनचा अमानवी चेहरा समोर आला आहे. या पाणी रोखल्यामुळे थायलंड, लाओस, कंबोडिया आणि व्हिएतनाम या देशांमध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. या देशांची हालत एवढी गंभीर बनली आहे की, कोरोनाच्या विळख्यातही शेतकरी, मच्छीमारांना आंदोलने करावी लागत आहेत. चीनच्या या पावलामुळे भारतात येणाऱ्या ब्रम्हपुत्रा नदीच्या पाण्यावरही शंका उपस्थित होऊ लागली आहे.
न्यूयॉर्क टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. चीन फेब्रुवारीमध्ये कोरोनाशी लढत होता. त्याचवेळी चीनच्या परराष्ट्र मंत्र्याला अचानक लाओसला जावे लागले होते. कारण दक्षिण पूर्वेकडील आशियाई देशांची जीवनवाहिनी म्हटली जाणारी मेकांग नदीचे पाणी आटायला लागले होते. यामुळे तेथे शेतकरी मच्छीमारांनी आंदोलन सुरु केले होते. यासाठी चीनचे मंत्री वांग यी यांना लाओसला जावे लागले होते.
यावेळी वांग यांनी सांगितले होते की, शेतकरी मच्छीमारांचे दु:ख समजू शकतो. चीनही यंदा दुष्काळाचा सामना करत आहे. यामुळे मेकांग नदीचे पाणी कमी झाले आहे. या उलट अमेरिकेच्या जलवायू संशोधकांनी सांगितले की, चीनमध्ये दुष्काळ पहिल्यांदाच पडलेला नाही. तिबेट पठारावरून मेकांग नदी वाहते. या पाण्याच्या प्रवाहाला चीनच्या इंजिनिअरनीच अडकाठी आणली आहे. यामुळे तिचा प्रवाह खूप कमी झाला आहे.
त्या देशांसाठी 'गंगा'
मेकांग ही नदी मोठ्या प्रवाहाची आहे. जसे भारतासाला गंगा आणि ब्रम्हपुत्रा नदीचे महत्व आहे तसेच थायलंड, लाओस, कंबोडिया आणि व्हिएतनाम या देशांना मेकांगचे आहे. ही नदी या बाजुच्या देशांसाठी गंगा आहे. गेल्या काही वर्षांपासून मध्येच नदीतील पाण्याचा स्तर कमी होतो तर मध्येच पूर आल्यासारखा वाढत असल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे. चीनने या नदीवर मोठ्या प्रमाणावर धरणे उभारली आहेत.
धक्कादायक! भारतासाठी येणारे टेस्टिंग किटचे जहाज अमेरिकेला पाठविले; WHO वर गंभीर आरोप
CoronaVirus लॉकडाऊन वाढला, तुमचा कारवरील खर्चही वाढू शकतो; ही काळजी जरूर घ्या