India-China: कुख्यात पाकिस्तानी दहशतवाद्याला चीनचे समर्थन, UNमध्ये भारताच्या प्रस्तावाचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 05:10 PM2022-08-11T17:10:25+5:302022-08-11T18:21:44+5:30

India-China: भारताच्या दहशतवादाविरोधातील लढाईत चीनने पुन्हा एकदा अडथळा आणला आहे.

China support Pakistani based terrorist using VITO in United Nations; India-America gave proposal | India-China: कुख्यात पाकिस्तानी दहशतवाद्याला चीनचे समर्थन, UNमध्ये भारताच्या प्रस्तावाचा विरोध

India-China: कुख्यात पाकिस्तानी दहशतवाद्याला चीनचे समर्थन, UNमध्ये भारताच्या प्रस्तावाचा विरोध

googlenewsNext

नवी दिल्ली/न्यूयॉर्क:भारताच्या दहशतवादाविरोधातील लढाईत चीनने पुन्हा एकदा अडथळा आणला आहे. बुधवारी चीनने पाकिस्तान-आधारित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अब्दुल रौफ अझहर याला संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून सूचीबद्ध करण्यापासून रोखले. भारत आणि अमेरिकेने अझहरचा आंतरराष्ट्रीय दहशतवादी यादीत समावेश करावा, असा प्रस्ताव ठेवला होता. अझहरचा 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या विमानाच्या अपहरणात सहभाग होता.

रौफ अझहर मसूद अझहरचा भाऊ
भारत-अमेरिकेने दोन आठवड्यांपूर्वी अब्दुल रऊफ अझहरला दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव दिला होता. अब्दुल रौफ अझहर हा मसूद अझहरचा धाकटा भाऊ. मसूद अझहर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे. इतर 14 सदस्य देशांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवली असली तरी एकट्या चीनने या प्रस्तावाला विरोध केला आहे. चीनच्या या विरोधानंतर भारताने यूएन सुरक्षा परिषदेत चीनला फटकारले. 

जगातील काही कुख्यात दहशतवाद्यांविरोधात ठोस पुरावे असूनही हे प्रस्ताव थांबवले जात आहेत, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या राजदूत रुचिरा कंबोज यांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, चीनने असे पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही बीजिंगने यूएनमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात भारताने आणलेले अनेक ठराव व्हेटो पॉवरने रोखले आहेत. चीनने पाकिस्तानस्थित दहशतवाद्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून सूचीबद्ध करण्यापासून रोखण्याची या वर्षातील ही दुसरी वेळ आहे.

Web Title: China support Pakistani based terrorist using VITO in United Nations; India-America gave proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.