चीन करतोय तिस-या विमानवाहू जहाजाची निर्मिती

By admin | Published: February 21, 2017 03:26 PM2017-02-21T15:26:29+5:302017-02-21T15:26:29+5:30

चीन तिस-या विमानवाहू जहाजाची निर्मिती करत आहे.

China is the third aircraft carrier | चीन करतोय तिस-या विमानवाहू जहाजाची निर्मिती

चीन करतोय तिस-या विमानवाहू जहाजाची निर्मिती

Next

ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 21- दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेच्या वाढलेल्या हस्तक्षेपामुळे चीन आधीच त्रस्त आहे. त्यामुळे दक्षिण चीन समुद्रात स्वतःचा दबदबा कायम राहावा, यासाठी चीन तिस-या विमानवाहू जहाजाची निर्मिती करत आहे. अमेरिकेच्या मॉडलवर आधारित हे विमानवाहू जहाज शांघाईमध्ये तयार केलं जात आहे.

चीनचं पहिलं विमानवाहू जहाज सोव्हिएत संघाच्या काळातील आहे. तर दुसरं विमानवाहू जहाज दालियान पोर्टमध्ये तयार होत असून, त्याचं मॉडेलही पहिल्या विमानवाहू जहाजासारखंच आहे. या विमानवाहू जहाजाला पहिल्यापेक्षाही अधिक अत्याधुनिक बनवण्याचा चीनचा प्रयत्न सुरू आहे. तसेच 2020मध्ये ते सेवेत येण्याची शक्यता आहे. चीनचं तिसरं विमानवाहू जहाज हे अमेरिकेच्या विमानवाहू जहाजाप्रमाणे दिसणार आहे. लढाऊ विमान वाहून नेण्यासाठी यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिस्टीम बसवण्यात आली आहे.
(दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेच्या विमानवाहू जहाजांची गस्त, चीन संतप्त)
(दक्षिण चीन समुद्रावरून अमेरिकेचा ड्रॅगनला इशारा)
चीनच्या मते, पश्चिमेकडच्या प्रशांत महासागर आणि हिंद महासागरात दोन विमानवाहू जहाजांची आवश्यकता आहे. त्यामुळेच आम्ही हे विमानवाहू जहाज बनवतो आहोत. तत्पूर्वी विमानवाहू जहाज लिओनिगनं दक्षिण चीन समुद्रातील तैवानजवळ युद्धाभ्यास केला आहे. चीनची विमानवाहू जहाजांतून विमान वाहण्यासाठी जे-15 या लढाऊ विमानांचीही निर्मिती करण्याची योजना आहे.

Web Title: China is the third aircraft carrier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.