शस्त्रास्त्र निर्यातीत चीन तिसऱ्या स्थानी

By Admin | Published: March 16, 2015 11:38 PM2015-03-16T23:38:29+5:302015-03-16T23:38:29+5:30

चीनने शस्त्रास्त्र निर्यातीत जर्मनीला मागे टाकले असून, जगातील तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळविले आहे.

China third place in arms export | शस्त्रास्त्र निर्यातीत चीन तिसऱ्या स्थानी

शस्त्रास्त्र निर्यातीत चीन तिसऱ्या स्थानी

googlenewsNext

बीजिंग : चीनने शस्त्रास्त्र निर्यातीत जर्मनीला मागे टाकले असून, जगातील तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळविले आहे. अमेरिका व रशिया यांचा या निर्यातीत पहिला व दुसरा क्रमांक असून, ५८ टक्के शस्त्रे या दोन देशांकडून निर्यात केली जातात, चीनची निर्यात त्यांच्यापेक्षा ५ टक्के कमी आहे.
जागतिक शस्त्रास्त्र बाजारात चीनचा वाटा गेल्या पाच वर्षांत (२०१० ते २०१४) १४३ टक्के आहे, असे आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेने आपल्या सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे.
२००९ ते २०१४ या कालावधीत चीन लढाऊ विमाने, जहाजे व इतर शस्त्रास्त्रे निर्यात करीत असे, त्यावेळी चीनचा वाटा जागतिक बाजारपेठेत तीन टक्क्यांनी वाढला. चीनच्या स्थानिक शस्त्रास्त्र निर्मितीची क्षमता वाढती असल्याचे सिप्री या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेने म्हटले आहे. याआधी चीन शस्त्रास्त्रांची आयात करीत असे. (वृत्तसंस्था)
रशिया व युक्रेनकडून चीन शस्त्रास्त्रे घेत असे; पण या देशांची डबघाईला आलेली अर्थव्यवस्था व त्यांच्या शस्त्रास्त्रांची नक्कल करण्याची सवय यातून चीनने शस्त्रास्त्रनिर्मितीत स्वत:चे स्थान बळकट केले आहे. चीनकडून ३५ देशांना शस्त्रास्त्रांची निर्यात होते. त्यात पाकिस्तान, बांगलादेश व म्यानमार यांचा समावेश आहे.

Web Title: China third place in arms export

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.