चीनविरोधात आठ देशांनी केली एकी; अमेरिकेच्या पाठिंब्यानं उघडली आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 10:44 PM2020-06-06T22:44:07+5:302020-06-06T23:02:41+5:30
जागतिक व्यापार, संरक्षण आणि मानवाधिकारांचा चीनकडून होत असलेल्या उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
वॉशिंग्टनः कोरोनाचा फैलाव जगभरात झाला असून, अनेक देश यासाठी चीनला जबाबदार धरत आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या देशांनीही चीनविरोधात उघड भूमिका घेतली आहे. चीनचा दक्षिण चिनी समुद्रातील आक्रमक पवित्र्यामुळेही तो अमेरिकेच्या रडारवर आहे. विशेष म्हणजे चीन अशा परिस्थितही भारताविरोधात कुरापती करत आहे. आता चीनला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेसह आठ देशांच्या वरिष्ठ खासदारांची एक आघाडी उघडण्यात आली आहे. जागतिक व्यापार, संरक्षण आणि मानवाधिकारांचा चीनकडून होत असलेल्या उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, इंटर-पार्लामेंटरी अलायंस ऑन चायनाची (IPAC)ची निर्मिती करण्यात आली आहे. चीनशी संबंधित मुद्द्यांबाबत कृतीशील आणि रणनीतिकदृष्ट्या भूमिका ठरवून कृती करण्यासाठी आयपीएसीची स्थापना करण्यात आली आहे. अमेरिका, जर्मनी, ब्रिटेन, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स्वीडन, नॉर्वे आणि यूरोपच्या संसदेचे सदस्य या संघटनेत सहभागी आहेत. या संघटनेत अमेरिकेचे रिपब्लिकन सिनेटर मार्को रुबिओ आणि डेमोक्रॅटचे बॉब मेनेंडेझ, जपानचे माजी परराष्ट्रमंत्री जेन नाकातानी, युरोपियन संसदेत परराष्ट्र व्यवहार समितीचे सदस्य मिरियम लेक्झमन आणि ब्रिटनमधील कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार इयान डंकन स्मिथ यांचा समावेश आहे. याखेरीज जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स्वीडन आणि नॉर्वेमधील नेतेही या संघटनेत आहेत.
ज्या देशांच्या खासदारां(सिनेटर)चा या संघटनेत समावेश आहे, त्यापैकी बर्याच देशांना चीनच्या महत्त्वाकांक्षेमुळे राजकीय आणि आर्थिक परिणाम भोगावे लागले आहेत. जेव्हा चीनच्या हुवेई टेक्नॉलॉजी कंपनीच्या कार्यकारिणीला कॅनडामध्ये अटक करण्यात आली, तेव्हा चीनने दोन कॅनेडियन नागरिकांना कारणाशिवाय ताब्यात घेतले होते. नॉर्वे आणि चीनचे 6 वर्ष जुने व्यावसायिक संबंध आहेत. जेव्हा नॉर्वेने चिनी सरकारच्या टीकाकारांना नोबेल शांतता पुरस्कार प्रदान केला, तेव्हा चीनने हळूहळू त्याच्याशी व्यापार कमी केला. कोरोनाच्या साथीसाठी ऑस्ट्रेलियाने चीनला दोष दिला, तेव्हा चीनने ऑस्ट्रेलियन वस्तूंवर नवीन कर लादले. चीनमध्ये या निर्णयाची तुलना १९००च्या दशकातील ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, रशिया, जपान, इटली आणि ऑस्ट्रिया-हंगेरी या ८ नेशन अलायन्सशी केली जात आहे.
हेही वाचा
विकृतीचा कळस! लहान मुलासमोरच मित्रांसोबत मिळून पतीनं केला पत्नीवर सामूहिक बलात्कार
शिवाजी महाराजांच्या कारभाराचा जगापुढे आदर्श, हा वसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध- उद्धव ठाकरे
कोरोनाच्या संक्रमणात रक्तगटाचीही महत्त्वाची भूमिका; 'या' लोकांना जास्त धोका
'त्या चीनविरोधी जाहिरातीमुळे ट्विटरकडून अमूलचं हँडल ब्लॉक?
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा सोडला उद्धव ठाकरेंवर 'बाण', आता केल्या 5 प्रमुख मागण्या
सोन्याचे भाव गडगडले, चांदीच्या दरातही मोठी कपात, जाणून घ्या...
चीनला मात द्यायची असल्यास त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घाला, बाबा रामदेव यांचं आवाहन