China Tomb Secret: चीनमध्ये सुरू होतं नाल्याचं काम, अचानक सापडला 800 वर्षांपूर्वीचा मकबरा; आतला नजारा पाहून सगळेच अवाक!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 07:47 PM2023-04-08T19:47:50+5:302023-04-08T19:47:50+5:30
मकबऱ्यातील काही शिलालेखानुसार, हा मकबरा 1190 ते 1196 इसवी सन दरम्यान बांधला गेला असावा असे बोलले जात आहे. तेव्हा हा भाग जुरचेन जिन राज्याच्या अधिपत्याखाली होता.
बिजिंग - चीनच्या उत्तरेकडील भागात 800 वर्षांपेक्षाही अधिक जुना विटांनी बनलेला एक मकबरा सापडला आहे. नाल्याची डागडुजी करणाऱ्या कांमगारांना हा मकबरा आढळून आला आहे. या मकबऱ्यात तीन मृतदेहही आढळून आले आहेत. यांपैकी दोन वृद्ध व्यक्तींचे तर एक मुलाचे आहे. याशिवाय यात मातीची काही भांडीही सापडली आहेत.
मकबऱ्यातील काही शिलालेखानुसार, हा मकबरा 1190 ते 1196 इसवी सन दरम्यान बांधला गेला असावा असे बोलले जात आहे. तेव्हा हा भाग जुरचेन जिन राज्याच्या अधिपत्याखाली होता. शांक्सी इंस्टिट्यूट ऑफ आर्कियोलॉजीनुसार, बिजिंगच्या नैऋत्येला जवळपास 650 किमी दूर अंतरावर युआनकू काउंटीमध्ये डोंगफेंगशान गावाजवळ मजुरांनी 2019 मध्ये हा मकबरा शोधून काढला होता.
इंस्टिट्यूटच्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी या मकबऱ्याचे डॉक्यूमेंटेशन केले आहे. चायनीज अकादमी ऑफ सोशल सायन्सेसच्या म्हणण्यानुसार, या मकबऱ्याच्या उत्खननानंतर त्याचा अहवाल फेब्रुवारीमध्ये जारी करण्यात आला आहे. हा मकबरा त्याच्या काळातील इतर मकबऱ्यांप्रमाणेच आहे. एका जिन्याच्या माध्यमाने या मकबऱ्यातून मुख्य चेंबरपर्यंत पोहोचले जाऊ शकते. हा मकबरा दोन मीटर लांबीच्या चौकोनात बनलेला आहे. याचे छत पायऱ्यांप्रमाणेच विटांनी बनलेले आहे.
विटांवर डिझाईन -
संपूर्ण कक्ष नक्षिदार लाकडाप्रमाणे दिसणाऱ्या विटांनी बनलेला आहे. यावर काही कोरीव कामही आहे. भिंतींवर आणखी सजावट आहे. ज्यांत सिंह, फुले आणि आत्म्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन आकृत्या आहेत.