चिनी ड्रॅगन भारताला समुद्रात घेरण्याच्या तयारीत! श्रीलंका-पाकिस्तान करणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 06:07 PM2023-07-28T18:07:45+5:302023-07-28T18:08:22+5:30

एका ब्रिटीश रिपोर्टमध्ये यासंबंधीचा खुलासा झाला आहे

china tries to fight india in ocean by building overseas military base likely in sri lanka pakistan port | चिनी ड्रॅगन भारताला समुद्रात घेरण्याच्या तयारीत! श्रीलंका-पाकिस्तान करणार मदत

चिनी ड्रॅगन भारताला समुद्रात घेरण्याच्या तयारीत! श्रीलंका-पाकिस्तान करणार मदत

googlenewsNext

China vs India, Pakistan Sri Lanka: चीन आणि भारत यांच्यातील सीमेवरील संबंध तणावाचे आहेत. चीन सतत भारतीय सीमांमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असते. वेळप्रसंगी चीनकडून त्यांच्या सैन्याच्या कृतीचे उघडपणे समर्थनही केले जाते. याचदरम्यान आता चीन भारताला समुद्री क्षेत्रात घेरण्याच्या तयारीत असल्याचे एका ब्रिटीश रिपोर्टमध्ये म्हटले आहे. चीनकडून श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये परदेशी लष्करी तळ उभारले जाणार आहेच. हे दोन्ही देश चीनच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. अशा परिस्थितीत या दोन देशांचे अंतर्गत आणि बाह्य धोरण चीनच ठरवत असतो. आता एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की चीन श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये आपले 'बळ' वापरून ते आणखी एक परदेशी लष्करी तळ उभारण्याच्या तयारीत आहे.

श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन देशांतील चिनी व्यावसायिक कंपन्यांनी तेल, धान्य आणि दुर्मिळ वस्तू यासारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंची निर्यात आणि आयात यासारख्या गोष्टींमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी बंदर आणि त्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीत सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. चीनचा एकमेव परदेशातील लष्करी तळ जिबूती या आफ्रिकन देशामध्ये आहे. चीनकडे जगातील सर्वात मोठे नौदल आहे, ज्यात सुमारे 500 जहाजे आहेत. त्यामुळे आता चीन श्रीलंका आणि पाकिस्तानच्या सागरी हद्दीत लष्करी तळ उभारून भारताला घेरण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

जिबूती मध्ये चीनचा एकमेव परदेशी लष्करी तळ

चिनी नौदलाने, पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्हीने 2016 मध्ये पूर्व आफ्रिकेतील जिबूती येथे $590 दशलक्ष खर्चून आपला पहिला परदेशी लष्करी तळ स्थापन केला. या लष्करी तळावर 2000 हून अधिक चिनी नौदलाचे कर्मचारी आणि अनेक युद्धनौका नेहमीच तैनात असतात. चीनच्या म्हणण्यानुसार, त्यांचा मुख्य उद्देश जवळच्या पाण्यातून जाणार्‍या चिनी मालवाहू जहाजांना समुद्री चाच्यांच्या हल्ल्यांपासून वाचवणे हा आहे. मात्र, गेल्या वर्षभरात चीनने जिबूतीमधील नौदल तळाचा लक्षणीय विस्तार केला आहे. या तळाचे आता सुसज्ज किल्ल्यात रूपांतर झाले आहे. अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात तैनात असलेल्या चिनी नौदलासाठी या लष्करी तळाचा वापर केला जाईल, असे चीनने सुरुवातीला सांगितले होते. मात्र, चीनने येथे युद्धनौका तैनात करण्यास सुरुवात केली आहे.

जगभरातील ८ देशांच्या बंदरांवर चीनची नजर

एका अहवालानुसार, चीनची नजर सध्या जगभरातील आठ देशांतील बंदरांवर आहे. त्यात श्रीलंका अव्वल स्थानावर आहे. अशी शक्यता आहे की या वर्षाच्या अखेरीस चीन श्रीलंकेत पुढील परदेशी लष्करी तळ उभारण्याची घोषणा करेल. या अहवालाचे नाव- "Furthering Global Ambitions: The Footprint of China's Ports and implications for Future Foreign Naval Bases - असे आहे. हे व्हर्जिनिया येथील कॉलेज ऑफ विल्यम अँड मेरी आणि ADDETA लॅबच्या संशोधकांनी तयार केले आहे. त्यासाठी 46 देशांमधील डेटा व 78 आंतरराष्ट्रीय बंदरांचे मूल्यांकन या संशोधकांनी केले.

 

Web Title: china tries to fight india in ocean by building overseas military base likely in sri lanka pakistan port

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.