बगराम एअरपोर्ट मिळविण्याच्या प्रयत्नात चीन; भारताविरोधात आखतोय अशी रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 04:53 PM2021-09-02T16:53:52+5:302021-09-02T16:55:49+5:30

बगराम एअरबेस हा वीस वर्षांपासून अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी तळ होता आणि अमेरिकेने येथूनच दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी हवाई हल्ले केले आहेत.

China trying to take over bagram air force base and use pakistan against india says Nikki Haley | बगराम एअरपोर्ट मिळविण्याच्या प्रयत्नात चीन; भारताविरोधात आखतोय अशी रणनीती

बगराम एअरपोर्ट मिळविण्याच्या प्रयत्नात चीन; भारताविरोधात आखतोय अशी रणनीती

Next

वाशिंग्टन - तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा करताच चीनअफगाणिस्तानातील सर्वात मोठा बगराम एअरबेस मिळविण्याच्या विचारात आहे. सध्याच्या परिस्थितीत तो भारताविरोधात पाकिस्तानचा वापर करेल. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या संयुक्त राष्ट्रांतील माजी डिप्लोमॅट आणि रिपब्लिकन नेत्या निक्की हेली, यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे. बगराम एअरबेस हा वीस वर्षांपासून अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी तळ होता आणि अमेरिकेने येथूनच दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी हवाई हल्ले केले आहेत. (China trying to take over bagram air force base and use pakistan against india says Nikki Haley)

अमेरिकेच्या नेत्या निक्की हेली यांनी बायडन प्रशासनाला सल्ला दिला आहे, की अमेरिकेने आपले मित्र देश भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि सर्व मित्र देशांशी घट्टपणे समन्वय बनविणे आवश्यक आहे. तसेच, त्यांना साथ देण्याचे आश्वासन देण्याचीही अत्यंत आवश्यकता आहे. याच बरोबर, तैवान, युक्रेन, इस्रायलसारख्या देशांनाच्याही पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता आहे.

"भारतानं 20 वर्षं शत्रूला मदत केली..."; काश्मीरसंदर्भात तालिबान स्पष्टच बोलला!

रिपब्लिकन नेत्या निक्की म्हणाल्या, अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतल्याने जिहादींची हिंमत वाढली आहे. ते याला त्यांचा नैतिक विजय मानत आहे. आता ते जगभरात त्यांच्या संघटनेसाठी भरती सुरू करतील. अशा परिस्थितीत आपण दहशतवादाविरोधात मोठी मोहीम सुरू करायला हवी.

चीनवरही नजर ठेवण्याची आवश्यकता -
माजी अमेरिकन डिप्लोमॅट म्हणाल्या, आपण स्वतःला पूर्णपणे सुरक्षित करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण एकिकडे, रशिया सातत्याने सायबर हल्ले करत आहे. तर दुसरीकडे दहशतवाद वाढत आहे. आपल्याला चीनवरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे. अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्यासंदर्भात त्या म्हणाल्या, की बायडन प्रशासनाने अफगाण लोकांचा विश्वास गमावला आहे. तेथे जिहादी आनंद साजरा करत आहेत आणि आपण आपली कोट्यवधी डॉलर्सची अत्याधुनिक उपकरणे आणि शस्त्रे त्यांच्यासाठी तेथे सोडली आहेत.

Web Title: China trying to take over bagram air force base and use pakistan against india says Nikki Haley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.