भारतीय सीमेवर शांतता आणि स्थिरता राखण्यास चीन इच्छूक - हुआ चुनयिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 11:45 PM2017-10-09T23:45:19+5:302017-10-09T23:45:42+5:30

चीन भारतीय सीमेवर शांतता आणि स्थिरता राखण्यास इच्छूक असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी सांगितले.

China wants to maintain peace and stability on the Indian border - Hua Chuning | भारतीय सीमेवर शांतता आणि स्थिरता राखण्यास चीन इच्छूक - हुआ चुनयिंग

भारतीय सीमेवर शांतता आणि स्थिरता राखण्यास चीन इच्छूक - हुआ चुनयिंग

Next

नवी दिल्ली - चीन भारतीय सीमेवर शांतता आणि स्थिरता राखण्यास इच्छूक असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी सांगितले. भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी प्रथमच भारत-चीन सीमेवरील सिक्कीमजवळील नाथूला भागाच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली, त्यांना नमस्ते म्हणायलाही त्यांनी शिकवले. यावेळी चीनने सीमेवरील शांततेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग म्हणाले, नाथूला येथील चीनच्या अग्रणी चौक्यांना भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी दिलेली भेट ही 1890 मध्ये ब्रिटन आणि चीन या दोन्ही देशांमध्ये झालेल्या ऐतिहासिक करारानुसार झाली आहे. यावर्षी सिक्कीममधील भारत-चीन सीमा तयार करण्यात आली होती. त्यामुळे या ऐतिहासिक करारानुसार, भारतीय संरक्षण मंत्र्यांचा दौरा हा आदर्श दौरा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या करारानुसार आणि सध्याच्या प्रासंगिक करारांनुसार चीन भारतीय सीमेवर शांतता आणि स्थिरता राखण्यास इच्छूक असल्याचे चुनयिंग यांनी स्पष्ट केले.

पेइचिंग आणि डोकलाम वादाच्या पार्श्वभूमीवर १८९० मध्ये ब्रिटन-चीन कराराचा दाखला देताना चीनने म्हटले की, सिक्कीम भागात तिबेटसोबत सीमेची निश्चिती या करारानुसारच झाली होती. मात्र, या सीमेचा वाद आता मिटला आहे. त्याचबरोबर सीतारामन यांचा नाथूला दौरा हा डोकलाम वादानंतर द्विपक्षीय संबंधांना सुधारण्याच्यादृष्टीने चांगले पाऊल आहे.

Web Title: China wants to maintain peace and stability on the Indian border - Hua Chuning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.