आक्रमण केल्यास चीनला महाग पडेल; तैवानच्या राष्ट्राध्यक्ष इंग-वेन यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 03:44 AM2020-01-16T03:44:36+5:302020-01-16T03:44:48+5:30
तैवान हा चीनचा भाग असल्याची भूमिका त्साई इंग-वेन आणि त्यांच्या पक्षाला मान्य नाही, याची कल्पना चिनी नेतृत्वाला होती.
तैपेई : तैवानसंदर्भात कठोर भूमिकेचा चीनने फेरविचार करावा. तैवान स्वतंत्र आहे. कोणत्याही प्रकारे आक्रमण केल्यास बीजिंगला खूप महाग पडेल, असा कणखर इशारा तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी दिला. स्वयंशासित तैवानला एकाकी पाडण्याच्या मोहिमेवरून चीनला परखड शब्दांत खडे बोल सुनावणाऱ्या त्साई इंग-वेन या नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विक्रमी मतांनी पुन्हा निवडून आल्या आहेत.
तैवान हा चीनचा भाग असल्याची भूमिका त्साई इंग-वेन आणि त्यांच्या पक्षाला मान्य नाही, याची कल्पना चिनी नेतृत्वाला होती.
तैवान आमचाच भाग आहे. तैवानने स्वतंत्र देश असल्याची घोषणा केल्यास एकेदिवशी तो आम्ही गरज पडल्यास बळाचा वापर करून कब्जात घेऊ, असा चीनचा निर्धार आहे. तैवानच्या राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत साई इंग-वेन यांनी स्पष्ट म्हटले होते की, आमचा देश पूर्वीपासून स्वतंत्र आहे.