चीनला किंमत मोजावीच लागेल! जगाला वेदना दिल्या, माणसे गमावली; अमेरिकेची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 02:29 PM2020-04-24T14:29:50+5:302020-04-24T14:38:48+5:30
CoronaVirus चीनने कोरोनाची माहिती जगापासून लपविली. यामुळे जगभरातील लोकांना खूप वेदना झाल्या आहेत.
वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसवरून अमेरिका आणि चीनमध्ये शाब्दिक युद्ध सुरुच असून आज अमेरिकेने पुन्हा एकदा चीनला जबर किंमत मोजावी लागेल अशी धमकी दिली आहे. पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिलेली होती. आता अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी ही धमकी दिली आहे.
चीनने कोरोनाची माहिती जगापासून लपविली. यामुळे जगभरातील लोकांना खूप वेदना झाल्या आहेत. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने पारदर्शकता ठेवलेली नसल्याचा आरोप केला आहे. आताही चीन कोरोनासंबंधीची माहिती जगापासून लपवत आहे. चीनला याची किंमत मोजावीच लागेल असा इशारा माईक पॉम्पिओ यांनी दिला आहे.
चीनने वेदना दिल्या आहेत. लोकांच्या आयुष्याशी खेळ केला आहे. कोरोनाची माहिती न देता अमेरिकेसोबत जगाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवले आहे. आम्हाला आताही बऱ्याचशा गोष्टी माहिती नाहीत. चीनच्या जमिनीवर काम करण्यासाठी आम्ही माणसेही पाठवू शकत नाहीय. कोरोनाची पार्श्वभूमीही माहिती नाहीय. चीनची कम्युनिस्ट पार्टी आणि डब्ल्यूएचओ त्यांची जबाबदारी निभावण्यास अपयशी ठरल्याचा आरोप पॉम्पिओ यांनी केला.
पॉम्पिओ यांनी म्हटले की, चीनने जे केले आहे, त्याची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. चीन सरकारला जी पाऊले उचलायला हवी होती ती उचलण्यात आली नाहीत. चीनवर यापुढे औषधे, वैद्यकीय उपकरणांवर अवलंबून न राहणेच योग्य होईल. भविष्यात ही पाऊले उचलली जातील.
चीनमधून आम्हाला कोरोना व्हायरसच्या पहिल्या टप्प्यातील नमुने हवे आहेत. चीनने जे नमुने दिले आहेत ते बरोबर नाहीत. अमेरिकेमध्ये कोरोनाचे 8,42,376 रुग्ण आढळले आहेत आणि 49,800 लोकांचा मृत्यू झाला आहे, असेही पॉम्पिओ यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा...
CoronaVirus कोरोनाचे बुमरँग! न्यूयॉर्कहून व्हायरस घुसल्याने चीनचे दुसरे 'वुहान' लॉकडाऊन
अमेरिकेने वाळीत टाकले, चीनने WHO साठी अख्खी तिजोरीच खुली केली
सावधान! आता पीएफ अॅडव्हान्स काढाल तर 10 वर्षांनी पस्तावाल
मुलगा झाला म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत बत्ताशे, लाडू वाटले; निघाला कोरोना पॉझिटिव्ह
विखारी पाकिस्तान! भारताविरोधात मोठ्या सायबर युद्धाला सुरुवात
कोरोनाचे दुष्परिणाम; तब्बल २५ कोटी बळी जाण्याची भीती