चीनचेच जैविक शस्त्र होते कोरोना! आखला होता मोठा प्लॅन; वुहानच्या संशोधकानं केला बडा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 08:37 PM2023-06-28T20:37:56+5:302023-06-28T20:38:24+5:30
आपल्या एका सहकाऱ्याने व्हायरसचे चार वेग-वेगळे स्ट्रेन तयार केले होते. याचा उद्देश, कोणता व्हायरस अधिक वेगाने पसरतो? हे जाणने होता, असा दावा या संशोधकाने केला आहे.
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली असली तरी, कोरोना व्हायरससंदर्भात नव-नवी आणि धक्कादायक माहिती सातत्याने समोर येत असते. यातच आता वुहान इंस्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीतील संशोधकाने मोठा दावा केला आहे. चीनने कोरोना व्हायरस एक बायोवेपन अर्थात जैविक शस्त्र म्हणून तयार केला होता. एवढेच नाही, तर आपल्या एका सहकाऱ्याने व्हायरसचे चार वेग-वेगळे स्ट्रेन तयार केले होते. याचा उद्देश, कोणता व्हायरस अधिक वेगाने पसरतो? हे जाणने होता, असा दावा या संशोधकाने केला आहे.
चीनने कोरोना व्हायरसचा वापर जैविक शस्त्राप्रमाणे केला -
या संशोधकाचे नाव चाओ शाओ असे आहे. या संशोधकाने इंटरनॅशनल प्रेस असोसिएशनच्या सदस्य जेनिफर जेंग यांच्या सोबतच्या एका एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत धक्कादायक दावे केले आहेत. 26 मिनिटांच्या या मुलाखतीत, चाओ शाओने सांगितले की, कशा प्रकारे त्यांच्या सहकारी संशोधकाला त्याच्या बॉसने कोरोना व्हायरसचे चार स्ट्रेन देत, त्या चार पैकी कोणता स्ट्रेन अधिक वेगाने पसरू शकतो? कोणता स्ट्रेन अधिकाधिक प्रजातींना संक्रमित करू शकतो? तसेच, ते मानवाला किती आजारी करू शकता? हे टेस्ट करून सांग, असे सांगितले होते. चाओ शाओ म्हणाले, चीनने कोरोना व्हायरसचा वापर जैविक शस्त्राप्रमाणे केला.
वुहानमध्ये 2019च्या मिलिटरी वर्ल्ड गेम्सदरम्यान काही सहकारी गायब झाले होते -
याशिवाय, चाओ शाओ यांनी दावा केला की, वुहानमध्ये 2019च्या मिलिटरी वर्ल्ड गेम्सदरम्यान काही सहकारी गायब झाले होते. यानंतर, त्यांपैकी एकाने खुलासा केला होता की, त्यांना अॅथलीट्सचे आरोग्य आणि हायजीनची तपासणी करण्यासाठी हॉटेलमध्ये पाठविण्यात आले होते. मात्र, हायजीन तपासण्यासाठी व्हायरॉलॉजिस्टची आवश्यकता नसते. गायब झालेल्या सहकाऱ्यांना व्हायरस पसरविण्यासाठी हॉटेलमध्ये पाठविण्यात आले होते, असा संशय चाओ शानने व्यक्त केला आहे.
You must spread this like mad.
— Inconvenient Truths by Jennifer Zeng 曾錚真言 (@jenniferzeng97) June 27, 2023
First-ever explosive admission from #ShaoChao (单超 ) #WIV (#WuhanInstituteofVirology) researcher, vice director of #Wuhan#P4Lab: I Was Given 4 Strains of #Coronavirus to Select the Most Infectious one in Feb 2019. They were artificial, engineered… pic.twitter.com/pNNPugwwli
एवढेच नाही, तर चाओ शाओने इंटरव्यूमध्ये सांगितले की, एप्रिल 2020 मध्ये चाओ शानने म्हटले होते की, त्याला सुटका होणाऱ्या उइगर कैद्यांची तपासणी करण्यासाठी जिनयांग येथे पाठवण्यात आले होते. मात्र त्याला तेथे एक तर व्हायरस पसरवण्यासाठी पाठविण्यात आले होते किंवा व्हायरल मानवावर कशा पद्धतीने काम करतो, याची माहिती घेण्यासाठी पाठवण्यात आले होते.