चोरट्या चीनला जबर दणका; Vespa स्कूटरची नक्कल महागात पडली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 07:59 PM2020-05-26T19:59:23+5:302020-05-26T20:01:19+5:30
चीनकडे अशा अनेक जागतिक कंपन्यांच्या गाड्य़ा आहेत ज्यांची हुबेहुब नक्कल करण्यात आली आहे. यामध्ये मोटारसाय़कल, कारचाही समावेश आहे.
चीनच्या कंपन्या जगातील कोणत्याही चांगल्या उत्पादनाची हुबेहुब नक्कल करून ती विकण्यात पटाईत आहेत. या वस्तूंची गुणवत्ता खराब असल्याने आजवर अनेक जण पस्तावले आहेत. अशीच एका सुंदर स्कूटरची नक्कल करणे चीनच्या कंपनीला चांगलेच महागात पडले आहे.
चीनकडे अशा अनेक जागतिक कंपन्यांच्या गाड्य़ा आहेत ज्यांची हुबेहुब नक्कल करण्यात आली आहे. यामध्ये मोटारसाय़कल, कारचाही समावेश आहे. Triumph Speed Triple ची चीनने Benda BD250GS ही हुबेहुब नक्कल बनविली आहे. आता चीनला Vespa च्या स्कूटरची नक्कल करताना पकडण्यात आले आहे. Vespa ने आपल्या स्कूटरची नक्कल केल्याचा आरोप चीनच्या कंपनीवर लावला होता. हा आरोप खरा ठरला असून चीनच्या स्कूटरला नाकारण्यात आले आहे.
पियाजिओ ग्रुपने नुकतेच चीनच्या कंपनीने त्यांची व्हेस्पा स्कूटरची डिझाईन चोरली असल्याचा आरोप केला होता. ही नक्कलबाज स्कूटर 2019 EICMA मोटरसायकल शोमध्ये लाँच करण्यात आली होती. यावर पियाजिओने आक्षेप घेतला होता. युरोपियन युनियन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑफीसने चीनच्या कंपनीची स्कूटर रद्दबातल ठरविली आहे.
चीनच्या कंपनीची ही स्कूटर Vespa Primavera पेक्षा वेगळी दिसत नाही. पियाजिओने या स्कूटरचे डिझाईन २०१३ मध्येच रजिस्टर केले होते. यामुळे पियाजिओचा विजय झाला आहे. ही लढाई आता खरी सुरुवात असल्याचे मानले जात आहे. जगभरातील प्रसिद्ध ब्रँडची कॉपी करण्याचा सपाटाच चीनी कंपन्यांनी लावला होता. यावरही आता अनेक कंपन्या पुढे येण्याची शक्यता आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
थकलेल्या EMI वरील व्याजवसुली थांबणार? आरबीआयला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
ठोश्याला ठोसा! चीनचे जेवढे सैनिक तेवढेच भारताचे जवान होणार तैनात
प्रेमवीराने प्रेयसीला भेटविण्याची गळ घातली; सोनू सुदने दिले खतरनाक उत्तर
धक्कादायक! चीनची कोरोनाविरोधावर मोठी चाल; दोन युद्धनौका तैवानच्या दिशेने रवाना
राष्ट्रपती राजवट: नारायण राणेंनी प्रतिक्रिया देणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांना सुनावले
स्थिर सरकारवर शरद पवार बोललेत, पण...; नारायण राणेंचा टोला
विशालहृदयी भारत! चीनच्या नादाला लागलेल्या नेपाळने मदत मागितली; तत्काळ देऊ केली