चीनची अर्थव्यवस्था आणखी मंदावली
By Admin | Published: April 16, 2016 02:20 AM2016-04-16T02:20:06+5:302016-04-16T02:20:06+5:30
आर्थिक स्थिती स्थिरस्थावर होत असल्याचा दावा येथील सरकार आणि अधिकारी करीत असतानाच चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आपला आर्थिक वृद्धीदर आणखी घटून
बीजिंग : आर्थिक स्थिती स्थिरस्थावर होत असल्याचा दावा येथील सरकार आणि अधिकारी करीत असतानाच चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आपला आर्थिक वृद्धीदर आणखी घटून ६.७ टक्के झाल्याचे चीनने जाहीर केले आहे.
नॅशनल ब्युरो आॅफ स्टॅटिसटिक्सद्वारे जारी आकड्यानुसार चीनच्या सकल घरेलू उत्पादनात जानेवारी-मार्च २0१६ या तिमाहीत वृद्धी होऊन ती ६.७ टक्के झाली. या तिमाहीत जीडीपी १५.९ खर्च युवान झाला. यापूर्वीच्या तिमाहीतही वृद्धीदर घसरला. सात वर्षांतील नीचांकी स्तरावर येऊन ६.८ टक्क्यांवर आला होता. गेल्या वर्षी चीनचा वृद्धीदर गेल्या २५ वर्षांत प्रथमच ७ टक्क्यांपेक्षा कमी होऊन ६.९ टक्क्यांवर आला होता.
२0१६ या वर्षासाठी सरकारने वृद्धीदराचा वेग ६.५ ते ७ टक्के राखण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मागील तिमाहीत वृद्धीदरात घरसण होऊन तो ६.७ टक्के झाला
असला तरीही सरकारी अपेक्षेप्रमाणेच आहे, असे अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले.