चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणार?; भारताच्या आक्रमक भूमिकेवरुन चीननं दिलं मोठं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 04:03 PM2020-06-20T16:03:24+5:302020-06-20T16:21:23+5:30
चीनची जीडीपी भारताच्या तुलनेत पाच पट अधिक आहे.
लडाखमध्ये LACवर भारत-चीनमध्ये मोठा संघर्ष झाला आहे. दोन्ही देशांमधल्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आलं आहे. तर चीनच्या ४३ सैनिकांना ठार करण्यात आलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चीनला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सक्षम असल्याचं सांगितलं. तसेच देशाचे जवान शहीद झाल्याने लोकांमध्ये चीनविरोधात संतापाची लाट आहे. यामुळे अनेक ठिकाणी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं काम सुरु आहे. काही ठिकाणी आंदोलन सुरु आहेत तर केंद्रानेही एमटीएनएल आणि बीएसएनएल यांनाही चीनी उपकरणं न वापरण्याचे आदेश दिले आहेत.
'चीनने आमच्यावरही 'या' पद्धतीने हल्ला करण्याचा केला प्रयत्न'; भारताच्या मित्रानं केलं सावध
भारताने चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केल्यानंतर चीनचा जळफळाट झाला आहे. भारताच्या या भूमिकेनंतर चीनमधील ग्लोबल टाइम्स या मुखपत्रातून चीनने भारताला आव्हान दिले आहे. चीनची जीडीपी भारताच्या तुलनेत पाच पट अधिक आहे. त्यामुळे छोटी असलेली भारताची अर्थव्यवस्था चीनला काय आव्हान देणार असं चीनने म्हटले आहे.
कौतुकास्पद! वडिलांच्या कष्टाचं चीज; गवंड्याचा मुलगा झाला तहसीलदार
चिनी मालावर बहिष्कार घालणं हे भारताच्या हिताचं नाही. कारण अनेक चिनी वस्तुंचे उत्पादन भारत करू शकत नाही आणि युरोप, अमेरिकेकडून या वस्तु तेवढ्या कमी किंमतीत भारताला मिळणारही नाही. त्यामुळे भारताने अमेरिकेच्या धोरणांप्रमाणे अनुसरण करू नये. भारतीय नागरिकांच्या जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होईल, अशी धमकी देखील चीनकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, आत्मनिर्भर भारत या माध्यमातून चीनची भारतीय बाजारातील मक्तेदारी मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारने पावलं उचलली आहेत. कोणताही माल आपल्याला बाहेरच्या देशातून आयात करण्यापेक्षा तो माल देशात बनवून त्याचा निर्यात केली जावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. चीन हा भारतीय बाजारपेठेतील मोठा गुंतवणूकदार आहे. भारतीय बाजारपेठेत चीनी वस्तू मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. पण सध्याच्या काळात चीन आणि भारत यांच्यात तणाव असल्याने भारतीयांच्या मनात चीनविषयी चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे चीनसोबत कोणताही व्यवहार करु नये अशी भूमिका सर्वसामान्य लोकांची आहे.