तिबेट स्वातंत्र्याचा मुद्दा सोडून लामांशी चर्चेचे चीनचे संकेत
By Admin | Published: March 11, 2015 11:50 PM2015-03-11T23:50:29+5:302015-03-11T23:50:29+5:30
तिबेटियन धर्मगुरू दलाई लामांसोबत पुन्हा चर्चा सुरू करण्याचे संकेत देतानाच चीनने तिबेटचे स्वातंत्र्य वा अधिक स्वायत्ततेचा मुद्दा सोडून
बीजिंग : तिबेटियन धर्मगुरू दलाई लामांसोबत पुन्हा चर्चा सुरू करण्याचे संकेत देतानाच चीनने तिबेटचे स्वातंत्र्य वा अधिक स्वायत्ततेचा मुद्दा सोडून समकालीन विषयांवर चर्चेची तयारी असल्याचे म्हटले आहे. चीनने लामांशी चर्चेचे संकेत देण्याची अनेक वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे.
चीनच्या राजकीय सल्लामसलत परिषदेच्या राष्ट्रीय वांशिक व धार्मिक व्यवहार समितीचे प्रमुख झोऊ वेइक्यून म्हणाले की, दलाई लामा त्यांची फुटीरवादी भूमिका व भ्रामक मध्यममार्गी दृष्टिकोन बदलतील, अशी आशा आम्ही करतो. तिबेटी उठाव दिनाच्या पार्श्वभूमीवर झोऊ यांनी हे निवेदन केले. लामांनी तिबेटियन नागरिकांना आत्मदहनास चिथावून तिबेट उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप झोऊ यांनी केला. (वृत्तसंस्था)