चीनची अशीही कमाल... तयार केला लांडग्याचाही डुप्लिकेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 07:43 AM2022-09-22T07:43:35+5:302022-09-22T07:44:02+5:30
सरोगेटसाठी निवडला कुत्रा
बीजिंगस्थित जीन फर्मने जगात प्रथमच एका जंगली लांडग्याचे यशस्विपणे क्लोनिंग केले आहे. ज्या उत्तर ध्रुवीय लांडग्याचे क्लोन केले आहे त्याला पांढरा लांडगा किंवा ‘ध्रुव प्रदेशीय लांडगा’ म्हणून देखील ओळखले जाते. हा कॅनडातील क्वीन एलिझाबेथ बेटांच्या टुंड्राचे मूळ आहे.
सरोगेटसाठी निवडला कुत्रा
माया नावाच्या या लांडग्याची प्रकृती चांगली आहे. मायाची सरोगेट आई ही एक बिगल (कुत्र्याची जात) होती. सरोगेटसाठी कुत्रा निवडल्याचे कारण सांगताना असे स्पष्ट करण्यात आले की, तो प्राचीन लांडग्याशी अनुवांशिक वंशाबाबत अधिक निकट आहे. त्यामुळे क्लोनिंगमध्ये यश मिळते.
का महत्त्वाचे?
लुप्त होत असलेल्या प्राण्याला वाचविण्यासाठी २०२० मध्ये उत्तर ध्रुवीय लांडग्याच्या क्लोनिंगचे संशोधन कार्य सुरू केले. त्यात यश मिळाले.
कशी झाली प्रक्रिया?
भ्रूण अपरिपक्व बीजांड आणि कोशिकांमधून तयार करण्यात आले.
भ्रूण सात बीगलच्या गर्भाशयात सोडण्यात आले.
निरोगी लांडगा म्हणून जन्माला आला.
आधीही प्रयत्न
१९९६ मध्ये क्लोनिंगची प्रक्रिया प्रथम प्राणी तयार करण्यासाठी स्कॉटलँडच्या शास्त्रज्ञाने वापरली होती. ‘डॉली’ नावाची मेंढी त्यावेळी तयार करण्यात आली होती.