चीनची आधुनिक क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा
By admin | Published: September 11, 2014 11:33 PM2014-09-11T23:33:04+5:302014-09-11T23:33:04+5:30
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे भारतासह अन्य चार देशांच्या दौऱ्यावर निघण्याच्या पार्श्वभूमीवर चीनने जमिनीवरून हवेत मारा करणारी अत्याधुनिक क्षेपणास्त्र पद्धती विकसित केली आहे
Next
बीजिंग : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे भारतासह अन्य चार देशांच्या दौऱ्यावर निघण्याच्या पार्श्वभूमीवर चीनने जमिनीवरून हवेत मारा करणारी अत्याधुनिक क्षेपणास्त्र पद्धती विकसित केली आहे. या पद्धतीचे नाव ‘होंग की-१०’ असून ती कमी उंचीवरून जहाजांवर मारा करण्याची शत्रूची क्षमता घटवू शकते, असे चीनच्या सेंट्रल टेलिव्हिजनने म्हटले आहे. बुधवारी हे क्षेपणास्त्र जहाजावरून सोडण्यात आल्याचे व जमिनीवरील मोबाईल लाँचर्सवर आल्याचे दाखविण्यात आले. हाँग की-१० क्षेपणास्त्र उड्डाणासाठी अवघ्या १० सेकंदांमध्ये तयार होऊ शकते, असे मॉडर्नशिप्सचे डेप्युटी एडिटर लान युन यांनी सांगितले.